माजी आमदार नितीन पाटील यांचे समर्थक म्हणून ओळख - शिक्षक आणि कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
शिवशाही वृत्तसेवा, छ.संभाजीनगर ( प्रतिनिधी तातेराव बनसोडे)
छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (ADCC Bank) सन २०२६-२०३१ या आगामी पाच वर्षांच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राजकीय आणि सहकार क्षेत्रातील हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीसाठी 'औरंगाबाद विभाग खाजगी माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था मर्यादित' या संस्थेचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून मनोज बाबुसिंग चव्हाण यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
मनोज चव्हाण हे माजी आमदार नितीन पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या निवडीमुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना जिल्हा बँकेच्या स्तरावर योग्य न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दिग्गजांची उपस्थिती आणि पाठबळ
या निवडीच्या प्रक्रियेत आणि महत्त्वपूर्ण निर्णयावेळी चंद्रकांत चव्हाण, नामदेव चव्हाण, अनिल पाटील, शरद देवरे, विलास सैंदाने, सुनिता काळे, अनुपमा कांबळे, गोपीचंद चव्हाण, प्रविण काळे, किरण मास्ट, कल्याण धायकर यांसह संस्थेचे इतर पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहकार्याबद्दल मानले आभार
आपल्या निवडीनंतर बोलताना मनोज चव्हाण यांनी सर्व उपस्थितांचे आणि मार्गदर्शकांचे आभार मानले. ते म्हणाले की, "माजी आमदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विश्वासाच्या जोरावर ही जबाबदारी मला मिळाली आहे. सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी ऋणी असून, आगामी काळात बँकेच्या माध्यमातून संस्थेचे हित जोपासण्यासाठी कटिबद्ध राहीन."
अभिनंदनाचा वर्षाव
मनोज चव्हाण यांच्या निवडीबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून आणि शैक्षणिक वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मनोज चव्हाण हे शिवशाही न्यूज नेटवर्कचे छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी आहेत. शिवशाही न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक सचिन कुलकर्णी आणि कार्यकारी संपादक मनिषा कुलकर्णी तसेच सर्व प्रतिनिधी यांनी मनोज चव्हाण यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
-----------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




