दिवसा वीज न मिळाल्यास डाॅ सुरभी भोसलेंचा महामार्ग रोकोचा इशारा

महावितरणच्या अन्याय विरोधात भुईज मधील शेतकरी संतप्त 

protest mseb, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

वाई तालुक्याच्या अनेक गावांतील शेतकऱ्यांना शेती पंपासाठी लागणारी वीज ही दिवसभर वाईच्या कार्यकारी अभियंता कार्यालया कडुन पुरवली जाते पण दुर्दैवाने  पुर्व भागातील भुईंज गावासह परिसरातील गावांना हे कार्यालय जाणीव पूर्वक शेतकऱ्याना त्रास देण्याच्या हेतुने की राजकीय दबावामुळे दिवसा  विज पुरवठा करत नाही  त्यामुळे विज पुरवठ्याचा प्रश्न आता दिवसे दिवस उन्हाची तीव्रता वाढत असताना गंभीर बनत चालला आहे ऐन उन्हाळ्यात भुईंज येथील विज वितरणच्या शाखा अभियंत्याच्या गलथान आणी बेजबाबदार व आडमुठ्या धोरणामुळे शेतकऱ्यांनची पिके पाण्यामुळे वाळु लागल्याने शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थीक नुकसान होणार आहे.याचा मनस्ताप शेतकऱ्याना होताना दिसत आहे त्या मुळे शेतकऱ्यान मध्ये संतापाची लाट उसळली आहे. 

सतत  विस्कळीत आणि अपुऱ्या वीज पुरवठ्याचा त्रास येथील शेतकरी सहन करत आहेत . भुईंज येथील विज वितरण कार्यालयातील शाखा अभियंत्यास  वारंवार विनंत्या करून देखील महावितरण कडून याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. शेतकऱ्यांनी भुईंज गणातुन वाई पंचायत समितीवर निवडुन गेलेल्या सुरभी भोसले यांची भेट घेऊन सविस्तर तक्रारींचा पाढा वाचला . शेतकरऱ्यानची जाणीव पूर्वक विज वितरण कंपनी दुजा भाव करुन अडवणूक करत असल्याचे सुरभी भोसले यांच्या हे लक्षात आले या गंभीर प्रश्नाला वाचा फोडली पाहिजे असा निश्चय करून त्यांनी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन तयार करून थेट वाईचे कार्यकारी अभियंता कार्यालय गाठले संतापलेल्या सुरभी भोसले यांनी कार्यालयातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता असलेले केरनाथ साळी यांची भेट घेऊन त्यांच्या समोर विजेसाठी ग्रासलेल्या शेतकऱ्यानच्या तक्रारींचा पाऊस पाडला आणी निवेदन दिले आहे .या निवेदनाची दखल न घेतल्यास किंवा निवेदनाला केराची टोपली दाखविण्याचा येथील अधिकाऱ्यानी प्रयत्न केल्यास  आता भुईंज मधील  शेतकरी आणि ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला असून थेट पुणे सातारा आणी सातारा पुणे या महामार्गावर रास्ता रोको सारख्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.

महावितरण मार्फत भुईंज गावच्या परिसरात शेतीसाठी सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन टप्प्यात वीज पुरवठा केला जातो. मात्र, ही वेळ शेतकऱ्यांसाठी अत्यंत गैरसोयीची ठरत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, वाई तालुक्यातील इतर गावांना अखंडित वीज पुरवठा केला जात असताना, केवळ भुईंजवरच हा अन्याय का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील शेतकरी या अन्यायाचा सामना करत आहेत. पिकांना पाणी देण्यासाठी रात्री-अपरात्री शेतात जावे लागते, ज्यामुळे शेतकर्यांच्या जिवितास धोका निर्माण होऊन  शारीरिक कष्ट वाढले आहेत. असा त्रास तालुक्यातील गावांन मधील इतर शेतकऱ्यांना सोसावा लागत नाही. त्यामुळे इतर गावांना एक न्याय आणि भुईंजच्या शेतकऱ्याना दुसरा का? असा संतप्त सवाल  शेतकऱ्यांन मधुन महावितरण‌च्या विरोधात विचारला जात आहे.

निवेदन देताना पंचायत समिती सदस्या डाँ सुरभी  भोसले, भुईंज गावचे सरपंच विजय वेळे,चेअरमन मदन शिंदे, माजी उपसरपंच प्रशांत जाधवराव,प्रगतशील शेतकरी प्रभाकर भोसले यांची उपस्थिती होती. 

भुईंज गावासह  परिसरातील गावांन मधील ग्रामस्थ आणी शेतकरी हे आपल्या रास्त मागण्या मंजुर करुन घेण्यासाठी महामार्गावर रस्ता रोको सारखे आंदोलन करत असताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास  त्याची संपूर्ण जबाबदारी हि महावितरण कार्यालय वाई व शाखा अभियंता कार्यालय भुईंज यांच्यावर राहिलं असा इशाराही सुरभी भोसले सरपंच विजय वेळे चेअरमन मदन शिंदे माजी उपसरपंच प्रशांत जाधवराव प्रगतीशील शेतकरी प्रभाकर भोसले यांनी दिला आहे .

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !