शिरूर नगरीत पंडित प्रदीप मिश्रा यांच्या श्री शिवमहापुराण महोत्सवाची जय्यत तयारी - पी आर धारिवाल फाउंडेशन च्या वतीने आयोजन

देशभरातून लाखो शिवभक्त राहणार उपस्थित

Pandit pradeep mishra, Shiv puran katha, shirur, pune, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण) 

पी आर धारिवाल फाउंडेशनच्या वतीने  २४ फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत येथे आंतरराष्ट्रीय कथा वाचक पंडित प्रदीपजी मिश्रा ( सिहोर वासी )यांच्या श्री शिवमहापुराण कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाची भव्य दिव्यता पाहता फाउंडेशनच्या वतीने मोठ्या स्तरावर नियोजन सुरू असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फाउंडेशनचे प्रमुख प्रकाशजी धारीवाल यांना शिरूरकरांची साथ लाभणार आहे.

रामलिंग रोड वर जाधव मळा येथे तीस एकर क्षेत्रात कथा कार्यक्रमासाठी यंत्रणा उभारली जात असून भाविकांच्या सोयी सुविधांकडे कटाक्षाने लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.कथा ऐकण्यासाठी येणार असणाऱ्या भाविकांसाठी सुसज्ज व आकर्षक असा तीन लाख वर्ग फूट मंडप उभारण्यात आला आहे.या मंडपाच्या बाजूला तीस ते चाळीस हजार वर्ग फूट जागेत प्रसादालय उभारण्यात आले असून भाविकांसाठी येथे भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.कथा वाचनाची वेळ एक ते चार अशी असून कथा वाचन सुरू होण्यापूर्वी व कथा वाचन झाल्यावर सायंकाळी अशा दोन वेळी भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.कथा वाचन कार्यक्रमाच्या सात दिवस काही हजारात भाविक हे मंडपातच मुक्काम करणार असल्याने त्यांच्यासाठी  मोबाईल स्वच्छता  व स्नान गृहाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.कथा श्रवण करण्यासाठी राज्यातून तसेच बाहेरील राज्यातून ही मोठ्या प्रमाणावर भाविक येतात.या भाविकांची संख्या व एकूणच येणाऱ्या वाहनांची संख्या पाहता,वाहनतळाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.शिरूर ग्रामीण (रामलिंग) येथे चार ठिकाणी तर मोतीनाला परिसरात तीन ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे.दिनांक २४ फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत रामलिंग ते मोतीनाला या परिसरात चार चाकी वाहनांना बंदी करण्यात येणार आहे. वाहनतळांपासून भाविकांना कार्यक्रम स्थळी पायी यावे लागणार आहे.

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कार्यक्रम मंडपात सी सी टीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत.तरीही महिलांनी कार्यक्रमाला येताना मौल्यवान दागिने परिधान करू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी केले आहे.कथा वाचन कार्यक्रम कालावधीत परिसरातील मांसाहाराची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.संपूर्ण देशात तसेच परदेशातही आंतरराष्ट्रीय कथा वाचक पंडित प्रदीपजी मिश्रा ( सिहोर वासी )यांच्या श्री शिवमहापुराण कथा कार्यक्रमाची मोठी महती असून शिरूरकरांना या कथा श्रवणाचे भाग्य लाभणार आहे.याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आदित्य धारीवाल यांच्या वतीने करण्यात आले आहे.

पी आर धारीवाल फाउंडेशनच्या वतीने शिवमहाकथा पुराण वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.फाउंडेशन अद्वितीय नियोजनास समर्थ आहे.तरीही या आयोजनात फाउंडेशनचे प्रमुख प्रकाशजी धारीवाल, दिनाभाभी धारीवाल व आदित्यजी धारीवाल या परिवाराने शिरूरकरांना सामावून घेतले आहे.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी त्यांनी शिरूरकरांना साद घातली आहे.त्यास शिरूरकरांनीही प्रतिसाद दिला असून शिरूर शिवमय करण्याचा संकल्प शिरूकरांनी केला आहे.या कार्यक्रमात सेवा देण्यासाठी शेकडो शिरूकरांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला असून यातून निश्चितच येणाऱ्या लाखों भाविकांना यथोचित सेवा मिळू शकणार आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !