शाळेच्या कामकाजा विषयी व्यक्त केले समाधान
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)शनिवार दि ७ मार्च रोजी प्राथमिक शिक्षण सह संचालक शिक्षण संचलनालय पुणे रमाकांत काठमोडे यांनी शाळेत सदिच्छा भेट दिली त्या वेळेस संगणक लॅब विषयी माहिती घेऊन विद्यार्थी त्याचा उपयोग करत असल्याने समाधान व्यक्त केले त्यावेळेस त्यांनी मुलांना प्रश्न विचारले तसेच निपुण महाराष्ट्र उपक्रमाची माहिती घेऊन समाधान व्यक्त करून शिक्षकांना मार्गदर्शन केले तसेच शाळेच्या भौतिक सुविधा,शालेय पोषण आहार या विषयी माहिती घेतली.त्या सोबत भेटी दरम्यान मितेश गादिया,उपनगराध्यक्ष तथा सभापती शिक्षण समिती तसेच सागर नरवडे सदस्य शिक्षण समिती, बाळकृष्ण कळमकर मा गटशिक्षण अधिकारी शिरूर पंचायत समिती , किसन खोडदे प्रशासन अधिकारी , संतोष चव्हाण मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते.शाळेच्या कामकाजा विषयी समाधान व्यक्त केले
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




