कमंडलू माध्यमिक आसरे विद्यालयाचा एक हात मदतीचा उपक्रम आदर्शवत - डॉ. श्री. महेश मेणबुदले

या उपक्रमांतर्गत शालेय स्पोर्ट्स ड्रेस व भगवद गीता ग्रंथ वाटप

one hand helping initiative,Dr. Mr. Mahesh Menbudle, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे )

रोहिडेश्वर शिक्षण संस्था संचलित कमंडलू पंचक्रोशी माध्यमिक आसरे ता. वाई विद्यालयात एक हात मदतीचा उपक्रम व या उपक्रमांतर्गत शालेय स्पोर्ट्स ड्रेस व भगवद गीता ग्रंथ वाटप कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी डॉ. मेणबुदले  बोलत होते. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर अध्यात्माची आवड या वयात लागली तर त्यांच्यावर चांगले संस्कार होतील असे ते म्हणाले. विश्वरूप वारकरी  शिक्षण संस्था रेणावळेचे संस्थापक ह.भ.प.सुहास गवळी यांच्या वतीने विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना भगवद् गीता ग्रंथ देण्यात आल्याबद्दल त्यांचेही डॉक्टरांनी कौतुक केले.

 यावेळी त्यांनी आपले वडील कै. दत्तात्रय पांडुरंग मेणबुदले यांच्या स्मरणार्थ 5555 /- रुपये व विद्यालयातील तीन विद्यार्थी दत्तक घेण्याचे जाहीर केले.

  सिद्धार्थ पाटील विकास अधिकारी एलआयसी शाखा वाई यांनी मुख्याध्यापक  जाधवसर यांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षक वृंद यांच्या सहकार्याने विद्यालयाचे कर्मचारी संतोष डगळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या एक हात मदतीचा व विद्यार्थी दत्तक पालक योजनेचे कौतुक करून भविष्यात अशा योजनांची फार गरज असल्याचे सांगितले.

 त्यांनी देखील एक विद्यार्थी दत्तक घेण्याचे जाहीर केले.

 विकास जाधव पत्रकार दैनिक पुढारी  यांनी अशा योजना गोरगरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी उपयोगी पडतील व त्यांना तेवढाच हातभार लागेल असे सांगितले. त्यांनी देखील एक विद्यार्थी दत्तक घेण्याचे जाहीर केले. तसेच सामाजिक कार्यकर्ते डॉ. रमेश तायडे यांनी देखील मार्गदर्शन करून आपण देखील विविध माध्यमातून विद्यालयाला मदत करणार असल्याचे सांगितले.   विशाल सणस संचालक सर्वोदय सेवा ट्रस्ट वाई यांनी एक विद्यार्थी दत्तक घेऊन प्रथम वर्षाचे 4000 /- रुपये जमा केल्याबद्दल त्यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

निलेश पवार मा. चेअरमन धोम विकास सेवा सोसायटी व  भिकू दादा सणस सदस्य ग्रामपंचायत रेनावळे यांनी प्रत्येकी एक विद्यार्थी दत्तक घेण्याचे जाहीर केले.  यावेळी सुरेश वाघ बाबुराव चोरट, नितीन शेलार, नारायण दादा सणस, राजाराम कोंढाळकर,बाबुराव खंडू सणस, आनंदा कांबळे, अशोक बाजीराव सणस, शिवाजी पिसाळ, अनिल पवार, तुषार सणस, साहेबराव सणस,सुभाष वैराट, वसंत गाडेकर,सदाशिव सणस तसेच महिला भगिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन  समीर सय्यद यांनी केले. प्रास्ताविक प्रकाश जाधव यांनी केले. संतोष डगळे यांनी आभार मानले.

     -----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !