वाई तालुका श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

युवकांचा उदंड प्रतिसाद - शंभरहून अधिक बाटल्यांचे संकलन!

Grand Blood Donation Camp‌, Satara, wai shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

वाई दि. ०२ : '. केवळ व्याख्याने न देता समाजासाठी प्रत्यक्ष कृती करणे' हा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान (वाई तालुका, लाखानगर, डांगे कॉलनी विभाग) तर्फे आयोजित भव्य रक्तदान शिबिरास युवकांचा उदंड प्रतिसाद लाभला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त सामाजिक बांधीलकी जपण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

     कार्यक्रमाची सुरुवात शिवप्रतिष्ठानच्या ज्येष्ठ धारकऱ्यांच्या हस्ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन व अभिवादन करून करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जाज्वल्य विचारांचा वारसा सांगत, समाजाप्रती आपले देणे लागते या भावनेतून धारकऱ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

     'रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान' हा संदेश देत परिसरातील शेकडो तरुणांनी या शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. दिवसभरात १०० हून अधिक रक्ताच्या बाटल्या संकलित करण्यात आल्या. हे संकलित रक्त नामांकित रक्तपेढ्यांना सुपूर्द करण्यात आले असून, यामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवदान मिळण्यास मदत होणार आहे.

     या शिबिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्येक रक्तदात्याला केवळ प्रमाणपत्र न देता, डॉ. सदाशिव शिवदे लिखित 'ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा' हे शंभूचरित्र भेट म्हणून देण्यात आले. शिवभक्तांमध्ये वाचन संस्कृती वाढावी आणि धाडसी इतिहासाची प्रेरणा मिळावी, या हेतूने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

     "छत्रपतींच्या विचारांवर चालत समाजसेवेचा वसा आपण जपला पाहिजे, या भावनेतून शिवभक्तांनी दाखवलेला हा उत्साह कौतुकास्पद आहे," असे मत आयोजकांनी व्यक्त केले.

     या शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वाई तालुका, लाखानगर, डांगे कॉलनी विभागाचे सर्व धारकरी आणि लाखानगर परिसरातील कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !