भुईंजचे सुपुत्र सुजय शेवते यांना - राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार-जाहीर

सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

State Level Model Art Teacher Award, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

४४ व्या कला शिक्षण परिषदेत होणार गौरव

महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या मान्यतेने, 'महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ'च्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठित 'राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार २०२६' सातारा जिल्ह्यातील कन्या शाळेचे कलाशिक्षक श्री. सुजय यशवंत शेवते यांना जाहीर झाला आहे.

सूजय शेवते हे मूळचे भुईंज (ता. वाई) येथील रहिवासी असून, त्यांनी कला क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याची, शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाची दखल घेऊन जिल्हा संघाच्या शिफारशीनुसार त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

२८ व २९ मार्च रोजी होणार वितरण हा पुरस्कार वितरण सोहळा सातारा येथील स्व. यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृह (जिल्हा परिषद) येथे आयोजित ४४ व्या कला शिक्षण परिषदेत (कार्यशाळा) संपन्न होणार आहे. दि. २८ आणि २९ मार्च २०२६ रोजी मान्यवरांच्या हस्ते सुजय शेवते यांना हा गौरव प्रदान केला जाईल.

या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. भुईंज आणि सातारा जिल्ह्याच्या कला क्षेत्रात या बातमीमुळे आनंदाचे वातावरण पसरले आहे. शेवते यांच्या या यशाबद्दल त्यांचे सहकारी, विद्यार्थी आणि भुईंज ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.

​                -----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !