५ एप्रिलपर्यंत संधी, अन्यथा गाड्या होणार 'स्क्रॅप'!
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
तुमची दुचाकी चोरीला गेली आहे किंवा अपघातानंतर पोलीस ठाण्यातच जमा आहे? जर हो, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध अपघातांमध्ये जप्त करण्यात आलेल्या २९ दुचाकींचा अद्याप कोणीही वाली समोर आलेला नाही. या वाहनांवर मालकी हक्क सांगण्यासाठी पोलिसांनी आता ५ एप्रिल २०२६ ही शेवटची मुदत दिली आहे.
भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी जाहीर आवाहन केले आहे की, पोलीस ठाण्याच्या आवारात अनेक दिवसांपासून २९ दुचाकी पडून आहेत. वारंवार प्रयत्न करूनही या वाहनांच्या मूळ मालकांशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे आता शासनाच्या नियमानुसार या वाहनांचा लिलाव किंवा विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ज्या नागरिकांची वाहने पोलिसांच्या यादीत आहेत, त्यांनी वाहनाची मूळ कागदपत्रे, स्वतःचे ओळखपत्र या कागदपत्रांसह तात्काळ भुईंज पोलीस ठाण्यात हजर राहावे. ५ एप्रिल २०२६ पर्यंत कोणीही दावा न केल्यास, या सर्व गाड्यांचा मालकी हक्क संपुष्टात येईल आणि त्यांचे 'स्क्रॅप' करून सरकारी नियमानुसार लिलाव केला जाईल. त्यानंतर कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही. तसेच प्रभारी अधिकारी, भुईंज पोलीस ठाणे: ९९२२४४८१००, मुद्देमाल कारकून: ९९२१२७१३२० तसेच भुईंज पोलीस ठाणे (दूरध्वनी): ०२१६७-२८५२३३ यावर संपर्क करण्याचे असे आवाहन भुईंज पोलिसांकडून करण्यात आले आहे.
यादीत हिरो होंडा स्प्लेंडर, बजाज पल्सर, टीव्हीएस व्हिक्टर, यामाहा, कायनेटिक, आणि इलेक्ट्रिक स्कूटर अशा एकूण २९ गाड्यांचा समावेश आहे. काही गाड्यांचे नंबर पुढील प्रमाणे आहेत: MH 11 Z 2691 (पल्सर), MH 11 BF 6462 (स्प्लेंडर +), MH 12 NA 7206 (स्प्लेंडर), MH 14 AK 3322 (बजाज)
MH 12 EK 8363 (पल्सर १५०)
(आणि इतर अनेक... अधिक माहितीसाठी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.)
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




