महिलांनी राही फाउंडेशन व आत्मनिर्भर सोशल फाउंडेशन चे मानले आभार
शिवशाही वृत्तसेवा,शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
श्रीराम नवमीचे औचित्य साधून राही फाउंडेशन चे अध्यक्षा तसेच शिरूर नगरपरिषद पाणीपुरवठा, जलनिस्सारण, व विद्युत विभाग सभापती डॉ. सुनिता ताई पोटे व आत्मनिर्भर सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा सुवर्णाताई चिपाडे यांच्या संयुक्त विद्यमाने 50% अनुदानात पुणे अहिल्यानगर येथील 15 महिलांना एक्टिवा दुचाकी वाहनांचे वाटप करण्यात आले
यावेळी निमोणे गावचे आदर्श महिला सरपंच जिजाताई दुर्गे, तसेच देवदैठण च्या सरपंच मंगल ताई कौठाळे, मीरा नर्सिंग होम चे डॉ.संतोष पोटे उपस्थित होते.
यावेळी विद्यमान नगरसेवक उमेश शेळके, नाना पोटे यांनी श्रीफळ फोडून महिलांना दुचाकी बहाल केल्या व शुभेच्छा दिल्या.
यावेळी कीर्ती वालेकर, सुरेखा उदमले ,नीता डमरे, आरती कोकडे, प्रीतम गायकवाड, स्नेहल सोनवणे शितल दुर्गे, संपत काळे ,मोनाली पवार ,जिजाताई दुर्गे ,शरद दुर्गे, ज्योती कापसे, राजश्री बरकडे, राजश्री राऊत ,रिंकू देवी पांडे इत्यादी महिला उपस्थित होत्या या सर्व महिलांनी राही फाउंडेशन व आत्मनिर्भर सोशल फाउंडेशन चे मनापासून आभार मानले.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




