9 जण गंभीर जखमी, गुन्हा अद्याप दाखल नाही
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेड राजा (प्रतिनिधी आरिफ शेख)
सिंदखेडराजा : तालुक्यातील दुसरबीड येथे एकाच समाजातील दोन गटांमध्ये झालेल्या किरकोळ वादाने भीषण रूप धारण करत तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जालना येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटना 22 तारखेला दुपारी झाली असून याप्रकरणी अद्याप पर्यंत कोणी तक्रार दिली नसल्याने पोलीस ठाण्यात अद्याप पर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे ठाणेदार संजय मातोडकर यांनी सांगितले दरम्याने पोलीस या घटनेवर लक्ष ठेवून आहेत सध्या गावात सर्वत्र शांतता आहे
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला दोन व्यक्तींमध्ये झालेला वाद पुढे मोठ्या गटांतील संघर्षात परिवर्तित झाला. या या हल्ल्यात लाठ्या काठ्या आणि दगडांचा वापर करत माजी तंटामुक्ती अध्यक्षांच्या घरावर ज हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात नौशाद शेख, जिलानी शेख, इमरान शेख, नसीर शेख आणि तनवीर शेख हे जखमी झाले आहेत. यातील काहीजण जणांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे काहींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, जखमींच्या डोक्यावर, हात-पायांवर गंभीर मार लागल्याचे दृश्य दिसत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात येत आहेत.
या संदर्भात ठाणेदार संजय मातोडकर यांनी सांगितले की, अद्यापपर्यंत कोणीही अधिकृत तक्रार देण्यासाठी पुढे आले नसल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
घटनेमागील नेमके कारण, सोशल मीडियावरील पोस्ट पूर्ववैमनस्य की आणखी काही आहे याबाबत चौकशी सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे दुसरबीडसह संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




