पंढरपुरातील सराईत वाळू तस्कर अंबान्या वर एम.पी.डी.ए. अंतर्गत कारवाई

वर्षभरासाठी येरवडा कारागृहात रवानगी

Sand smuggling, Solapur, Pandharpur Shivashahi news.

शिवशाही वृत्तसेवा,पंढरपूर प्रतिनिधी 

पंढरपूर शहर आणि परिसरात अवैध वाळू उपसा, चोरी आणि प्राणघातक हल्ले करून दहशत माजविणारा सराईत गुन्हेगार सूरज उर्फ अंबान्या दत्तात्रय पवार (रा. फूट रस्ता, कोर्टी, ता. पंढरपूर) याच्यावर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी एम.पी.डी.ए. (MPDA) कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. या आदेशानुसार त्याची रवानगी एक वर्षासाठी येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे करण्यात आली आहे.

गुन्हेगारीचा आलेख आणि दहशत

अंबान्या पवार हा पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू उपसा करून त्याची बेकायदेशीर विक्री करत होता. केवळ वाळू चोरीच नव्हे, तर या व्यवसायात अडथळा ठरणाऱ्यांवर जीवघेणे हल्ले करणे, लोकांना दमदाटी करणे आणि मारहाण करणे अशा गंभीर गुन्ह्यांची त्याला सवय जडली होती. भारतीय न्याय संहिता २०२३ च्या प्रकरण ६ आणि १७ मधील तरतुदींनुसार त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते.

वारंवार गुन्हे करूनही सुधारणा नाही

अंबान्याला यापूर्वी अनेकदा अटक करण्यात आली होती, मात्र जामिनावर बाहेर आल्यानंतर तो पुन्हा आपले अवैध कृत्य सुरूच ठेवत असे. अलीकडेच टेंभुर्णी पोलीस ठाण्यात त्याच्यावर 'खुनाचा प्रयत्न' (कलम १०९, १८९(२) सह आर्म ॲक्ट ३, २५, २७) यांसारखे गंभीर गुन्हे दाखल झाले होते. तो कायद्याला जुमानत नसल्याने आणि समाजासाठी धोकादायक ठरत असल्याने त्याच्यावर कडक कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.

प्रशासकीय कारवाई

पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्यामार्फत जिल्हादंडाधिकाऱ्यांकडे या कारवाईचा प्रस्ताव पाठवला होता. महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, वाळू तस्कर व धोकादायक व्यक्तींच्या विघातक कृत्यांना आळा घालणाऱ्या १९८१ च्या कायद्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करत अंबान्याला स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.

या पथकाने बजावली कामगिरी

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितमकुमार यावलकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये: वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे ,सपोफौ कल्याण ढवणे पोलीस नाईक सचिन इंगळे, सचिन हेंबाडे, दीपक नवले, हर्षद ठाकर स्थानिक गुन्हे शाखेचे अनिस शेख आणि सायबर सेलचे रतन जाधव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

पोलीस प्रशासनाचा इशारा: पंढरपूर शहरातील इतर वाळू तस्कर आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवरही अशाच प्रकारची कठोर कारवाई करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !