सोलापूरची दलितकन्या होणार खासदार
शिवसेना मुख्यनेते, उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या मुख्य उपस्थितीत आज विधानभवनात शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रा.डॉ. ज्योती वाघमारे यांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. यावेळी आवर्जून उपस्थित होतो. हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी कायमच शिवसेनेसाठी धडाडीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखला होता. आजही अगदी आक्रमकपणे मात्र तितक्याच अभ्यासू पद्धतीने राज्यभरात शिवसेनेसाठी काम करणाऱ्या ज्योतीताईंना हा सन्मान देऊन उपमुख्यमंत्री महोदयांनी शिवसेनेची कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याची परंपरा जपली आहे.
सोलापूरच्या आंबेडकरी चळवळीच्या पार्श्वभूमीतून पुढे आलेल्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी उच्च शिक्षण घेत इंग्रजी साहित्यात पीएचडी प्राप्त केली आणि प्राध्यापिका म्हणून कार्य करत समाजप्रबोधनाची वाट निवडली. मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलगू आणि कन्नड अशा पाच भाषांवरील प्रभुत्व, महाराष्ट्राच्या इतिहासाचा सखोल अभ्यास, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवरील पकड आणि संविधानाची जाण यामुळे त्या एक अभ्यासू व प्रभावी वक्त्या म्हणून ओळखल्या जातात. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय राहून त्यांनी विविध व्यासपीठांवरून शिवसेनेची भूमिका ठामपणे मांडली आहे. शिवसेना प्रवक्त्या म्हणून त्यांनी विरोधकांना मुद्देसूद आणि सडेतोड उत्तर देत पक्षाची बाजू भक्कमपणे मांडली आहे. दसरा मेळाव्यांमधील त्यांची घणाघाती भाषणं त्यांच्या अभ्यासू आणि धडाकेबाज व्यक्तिमत्वाची साक्ष देतात.
उच्चशिक्षित, अभ्यासू, सामाजिक जाण असलेली आणि तळागाळातील समाजाशी जोडलेल्या महिला म्हणून डॉ. ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणे हे नक्कीच योग्य ठरेल. त्यांच्या माध्यमातून संसदेत संविधान, सामाजिक न्याय आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना ठाम आवाज मिळेल, असा विश्वास आहे. डॉ. ज्योती वाघमारे यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




