वाई येथील उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
जिल्हाधिकारी सातारा संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार उपविभागीय अधिकारी डॉ.योगेश खरमाटे व तहसिलदार श्रीमती सोनाली मेटकरी यांच्या संकल्पनेतून मध्यवर्ती प्रशासकीय इमारत वाई येथे राबविलेला "जनताभिमुख महसूल प्रशासन - आता एका नजरेत…" हा उपक्रम सर्व नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत गत वर्षभरात अनेक लोकपयोगी निर्णय घेणेत आलेले असून त्याची अंमलबजावणी क्षेत्रीय स्तरावर सुरु आहे. या उपक्रमांतर्गत महसूल विभागाच्या विविध सेवा, योजना, प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रांची माहिती सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने एकाच ठिकाणी प्रदर्शित करण्यात आली आहे. नागरिकांना विविध कामांसाठी वारंवार कार्यालयात येण्याची गरज भासू नये, तसेच त्यांना अचूक आणि पारदर्शक माहिती मिळावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या दर्शनी भागावर लावण्यात आलेल्या माहितीफलकांद्वारे महसूल सेवा व योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
तसेच प्रत्येक प्रक्रियेसाठी लागणारी कागदपत्रे, शुल्क, कालावधी व संबंधित अधिकाऱ्यांची माहिती स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना आवश्यक माहिती त्वरित उपलब्ध होत असून यामुळे वेळेची बचत व कार्यालयीन कामकाजातील पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत माहिती सहज पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनाही या उपक्रमाचा मोठा फायदा होत आहे.
उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांनी सांगितले की, "प्रशासन नागरिकाभिमुख असावे आणि प्रत्येक सेवा नागरिकांपर्यंत सुलभतेने पोहोचावी व नागरिकांना शासनसेवा समजून घेणे सोपे व्हावे, यासाठी ही संकल्पना राबविण्यात आली आहे. पुढील काळातही अशा जनहिताच्या उपक्रमांना वाई उपविभागामध्ये प्राधान्य दिले जाईल."
तहसीलदार श्रीमती सोनाली मेटकरी यांनी नमूद केले की, _"नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रशासन सदैव तत्पर आहे. हा उपक्रम त्याच दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असून हा उपक्रम निश्चितच प्रभावी ठरत आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




