भक्ती, परंपरा आणि विकासाचा संगम: पाडळीची मानाची सासनकाठी निघाली जोतिबाच्या भेटीला!"
शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेतील अढळ मान असलेल्या निनाम-पाडळी (ता. सातारा) गावच्या पहिल्या मानाच्या सासनकाठीचे रविवारी अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात कोल्हापूरकडे प्रस्थान झाले. यावेळी गुलालाची उधळण आणि हलगीच्या कडकडाटात अवघ्या पाडळी नगरीत चैतन्याचे वातावरण पसरले होते.
या सोहळ्याप्रसंगी कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार मनोज घोरपडे आणि नागठाणे जिल्हा परिषद गटाचे सदस्य अजित साळुंखे (सर) यांच्या हस्ते सासनकाठीचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, तहसीलदार श्रीनिवास ढाणे, नायब तहसीलदार दयानंद कोळेकर यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विकासासाठी ४ कोटी ३५ लाखांचा निधी
पाडळी गावास 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यात्रा स्थळ' योजनेतून 'ब' वर्ग देवस्थानचा दर्जा मिळाला आहे. आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या विशेष प्रयत्नातून या देवस्थानच्या विकासासाठी ४ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आमदारांचा सत्कार करण्यात आला. "पाडळीच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही," अशी ग्वाही यावेळी आमदारांनी दिली. तर, अजित साळुंखे यांनीही देवस्थानच्या नियोजनबद्ध विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
"भक्ती, परंपरा आणि विकासाचा संगम: पाडळीची मानाची सासनकाठी निघाली जोतिबाच्या भेटीला!"
जोतिबाच्या नावाने चांगभल
कोल्हापूरच्या जोतिबा यात्रेत ज्या सासनकाठीला 'पहिल्या क्रमांकाचा मान' आहे, त्या तीर्थक्षेत्र पाडळीच्या मानाच्या सासनकाठीचा प्रस्थान सोहळा आज मोठ्या थाटामाटात पार पडला. हा केवळ एक सोहळा नसून सातारा जिल्ह्याच्या अस्मितेचा आणि परंपरेचा सोहळा आहे.
विशेष आनंद म्हणजे, आमदार मनोज घोरपडे यांच्या प्रयत्नातून पाडळी देवस्थानला 'ब' वर्ग दर्जा मिळून ४.३५ कोटींचा विकासनिधी मिळाला आहे. तसेच नागठाणे जिल्हा परिषद गटाचे सदस्य अजित साळुंखे (सर) यांच्या पुढाकारातून श्रद्धेसोबतच आता गावाच्या विकासालाही मोठी चालना मिळणार आहे.
भव्य गर्दी, गुलालाची उधळण आणि भक्तांचा उत्साह... पाडळी आज जोतिबाच्या भक्तीत न्हाऊन निघाली आहे!
यावेळी दर्शनासाठी रमेश ढाणे मंडल अधिकारी, PSI भोसले साहेब, PSI कारळे साहेब, सरपंच संजय ढाणे, माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र ढाणे, ज्योतिर्लिंग देव ट्रस्ट चेअरमन संजय कुंभार आणि सर्व विश्वस्त, पी वाय ढाणे , बाळासाहेब ढाणे मेंबर, राजेंद्र माने सर, दिलीप ढाणे , सागर ढाणे , सुशांत ढाणे तसेच भागातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




