गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालयात मराठी भाषा गौरवदिन उत्साहात संपन्न.

साहित्य निर्मितीतून मराठी भाषेचा स्वाभिमान कवी कुसुमाग्रजांनी जागविला - श्रीरंग काटेकर

Marathi language glory day, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. 

ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन. विजेत्या विद्यार्थ्यांना गौरविले. 

ज्ञान माऊलीच्या शब्द सुरेल रचनेतील ओव्या मधील गोडव्यांना साहित्यरुपी साधनेतून प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयाला साद घालत मराठी भाषेचा स्वाभिमान खऱ्या अर्थाने कवी कुसुमाग्रज यांनी जागविला आहे. असे मत गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले. ते लिंब.ता.जि सातारा येथील गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन व ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संतोष बेल्हेकर डॉ भूषण पवार डॉ धैर्यशील घाडगे डॉ माधुरी मोहिते,प्रा. सायली दळवी प्रा प्राजक्ता कांबळे प्रा गौरी काशीद रजिस्टर निलेश पाटील ग्रंथालय विभाग प्रमुख विजय निकम आदी प्रमुख उपस्थित होते.

श्रीरंग काटेकर पुढे म्हणाले की ज्या भाषेत आपण विचार करतो तीच बोलीभाषा विज्ञान व शिक्षणाला उपयुक्त ठरते मराठी भाषा संपूर्ण जगात बोलली जाते ही राजभाषा ज्ञानभाषा व्हावी यासाठी कवी कुसुमाग्रज यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी आकांक्षा बेलदार रूपाली जठारे या विद्यार्थ्यांनी कवी कुसुमाग्रज यांच्या काव्यरचनेवर आधारित कविता सादर केल्या. त्याचप्रमाणे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिनानिमित्त आयोजित केलेल्या निबंध हस्ताक्षर व प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्या ठरलेल्या निकिता जाधव कोमल इचके  फिझा नाझीम सादिया मुलाणी ओंकार कानडे या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पुस्तके भेट देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल विजय निकम यांनी केले आभार प्रा सायली दळवी यांनी मानले .

   मराठी माणसाच्या मनातील असलेला न्यूनगंड दूर करून खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या हृदयात स्वाभिमानाची ज्योत साहित्यरूपातून प्रत्येकाच्या मनामनात कवी कुसुमाग्रज यांनी पेटवली .आपल्या साहित्यरचनेतून मराठी माणसांच्या व्यथा व वेदनांना व्यासपीठ खऱ्या अर्थाने त्यांनी उपलब्ध करून दिले साता समुद्रापलीकडे मराठी भाषेचा गौरव व प्रसार व्हावा यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले.  

  संस्कृत भाषा ही खऱ्या अर्थाने मराठी भाषेची जननी आहे परंतु काळाच्या ओघात ही भाषा आता बोली भाषेच्या न वापरामुळे लोप पावत चालली आहे हे मराठी भाषेपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे या भाषेला उर्जित स्थिती प्राप्त करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने मराठी बरोबरच संस्कृत भाषेचाही बोलीभाषेत वापर करणे गरजेचे आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !