धावडा ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल - प्रभाग रचना निश्चित

गावात राजकीय वातावरण तापले

Gram Panchayat Election, Jalna, bhokardan, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,भोकरदन (प्रतिनिधी मजहर पठाण‌)

भोकरदन तालुक्यातील धावडा येथे दि. 27/02/2026 रोजी ग्रामपंचायत निवडणुकीची अधिकृत घोषणा होताच गावाच्या राजकीय वातावरणात चैतन्य संचारले आहे. शासनाच्या निर्देशानुसार शुक्रवार रोजी ग्रामपंचायत कार्यालयात वार्ड रचना “घड्याळ काट्या” पद्धतीनुसार पारदर्शक प्रक्रियेत प्रभाग रचना निश्चित करण्यात आली. संपूर्ण प्रक्रिया प्रशासनाच्या उपस्थितीत शिस्तबद्ध आणि नियमबद्ध पद्धतीने पार पडली.

या वेळी महसूल अधिकारी किशोर राजपूत साहेब व ग्राम विकास अधिकारी मदन अफोळकर यांनी मार्गदर्शन करत प्रभाग रचनेची माहिती उपस्थितांना दिली. गावातील विविध भागांचे लोकसंख्येचे प्रमाण, भौगोलिक रचना आणि प्रशासकीय निकष लक्षात घेऊन प्रभाग निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या महत्त्वपूर्ण बैठकीस  इकबाल खान पठाण, माजी सरपंच बेलआप्पा पिसोळे,माजी सभापती प्रमोद कुलकर्णी, गंगुबाई बोराडे, सय्यद नूर, जुमान चाऊस, आयाज पठाण, नानासाहेब देशमुख,  शंकर डोंगरे, परविन गांधीले, सोमनाथ घोडके, ज्ञानेश्वर आहेर, दीपक देवकर, अमोल देवकर, संतोष तबडे दिलीप वाघ मोतीलाल वैरी सय्यद रशीद आदी मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती होती. सर्वांनी शांततेत आणि संयमाने प्रक्रिया पार पडावी, अशी भूमिका व्यक्त केली.

तसेच पत्रकार , मुस्तफा पठाण,पत्रकार मजहर पठाण पत्रकार राजु शाह यांनीही या प्रक्रियेचे वृत्तांकन करण्यासाठी उपस्थिती दर्शवली.

ग्रामपंचायत ही गावाच्या विकासाचा कणा मानली जाते. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य आणि विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी यासाठी सक्षम नेतृत्व निवडणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रभाग रचना निश्चित झाल्यामुळे इच्छुक उमेदवारांची तयारी आता अधिक वेगाने सुरू होणार असून गावात निवडणुकीच्या चर्चांना उधाण आले आहे.

धावडा ग्रामपंचायत निवडणूक ही केवळ प्रतिनिधी निवडण्याची प्रक्रिया नसून गावाच्या सर्वांगीण विकासाचा दिशादर्शक टप्पा मानला जात आहे. आगामी काळात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच प्रचारसभांना आणि राजकीय रणनीतींना वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !