पसरणी येथील महाराजस्व अभियानाला उदंड प्रतिसाद
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई महसूल विभागाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन पसरणी या ठिकाणी घेण्यात आले. या शिबिरासाठी पसरणी व पश्चिम भागातील विविध गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिराच्या माध्यमातून महसूल विभागाच्या अनेक योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करण्यात आले.
प्रलंबित फेरफार निर्मिती, सातबारा उताऱ्यांवरील चुका दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे सातबारा उतारे, उत्पन्न रहिवासी व जात प्रमाणपत्र वाटप, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांसाठी मोफत दाखले वाटप या व यासारख्या अनेक सुविधा नागरिकांना देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तळागाळातील सामान्य नागरिकांचे महसूल विभागाशी निगडित अनेक प्रश्न व त्रुटी यावर सखोल मनोगत वाई पंचायत समितीचे विद्यमान सदस्य स्वप्निल गायकवाड यांनी मांडले.
पाणंद रस्त्यांना येणाऱ्या अडचणी, नागरिकांना होणाऱ्या रेशनिंग संबंधित अडचणी, कुणबी दाखले काढत असताना येणाऱ्या अडचणी याबाबत माहिती महसूल प्रशासनाला देण्यात आली. या सर्व अडचणींचे येणाऱ्या काळामध्ये आपण निरसन करू ही माहिती तहसीलदार सौ सोनाली मिटकरी यांनी दिली. मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक या शिबिरासाठी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमती सोनाली मिटकरी तहसीलदार वाई यांनी केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती अशोकराव गायकवाड, पंचायत समिती विद्यमान सदस्य स्वप्निल गायकवाड, पसरणी गावच्या विद्यमान सरपंच हेमलता गायकवाड, नायब तहसीलदार भाऊसाहेब जगदाळे, अमोल मर्ढेकर, पसरणी गावचे माजी सरपंच राजेंद्र शिर्के, यादव आबा महांगडे, विलास येवले, राजेश शिंदे, सुनील महांगडे, विश्वनाथ कांबळे, राजेंद्र येवले, शशिकांत महांगडे आदी मान्यवर व विविध विभागातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




