सोनगाव कचरा डेपोच्या आगीत कोण भक्ष्य होणार

सोनगाव कचरा डेपो म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण

Fire breaks out at garbage depot, Satara, shivshahi news.

 शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

सोनगाव येथील कचरा डेपोला लागलेल्या आगीत आजपर्यंत भल्याभल्यानी चांदी करून घेतले असल्याचे बोलले जात आहे. सोनगाव कचरा डेपो म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण असंच जणू काही समीकरण बनले आहे. आज पर्यंत या डेपो मधील भ्रष्टाचाराची प्रकरणे अनेकदा उघड होऊनही त्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे सध्याची स्थिती ही निर्माण झाली आहे. न्याय कोण देणार का आंधळं दळतंय आणि... पीठ खातय अशीच स्थिती राहणार का?

या झोलवर प्रहार कोण करणार असा सातारकरांचा खरा प्रश्न आहे. सातारकरांच्या कर रुपातून जमा होणारा कोट्यावधी रुपयाचा निधी खरंतर लोक उपयोगी कारणासाठी होणे आवश्यक आहे. परंतु या जमा होणाऱ्या निधीवर डल्ला कोण मारतय याच्यावरही अंकुश खरंतर हवा. डल्ला मारणारे नामा निराळं होतात असा आजपर्यंतचा सर्वच क्षेत्रात अनुभवास येतो. खरे तर सातारकरांनी जागृत होऊन या घटनेमागील खरा मास्टरमाईंड कोण याचा जाब विचारायला हवा. 

डोळस भूमिका ही खरं जागृत व्यक्तीची लक्षणे असतात परंतु डोळे असूनही अंधाची भूमिका, कान असून बहिऱ्याची भूमिका,तोंड असून मुक्याची भूमिका असलेली मंडळी नुसत्या बोलाचीच कडी बोलायचाच भात या कामाचे असतात. खरंतर सातारसारख्या शहरात सोनगाव डेपोमध्ये लागलेल्या कचऱ्याला आग हा गंभीर विषय असताना सातारकरांकडून उठावाची अपेक्षा होती. सारेच अलबेल असल्याने भ्रष्ट यंत्रणेचे यामध्ये फावते आहे.सोनगाव कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहेत.

 यामध्ये सोनगाव डेपोला आग लागली का अन्य कारणे आहेत यामागील सूत्रधार कोण याचा शोध घेणे गरजेचे आहे. आग इतक्या मोठ्या प्रमाणात लागताना येथील सुरक्षित यंत्रणा काय करत होती. सुरक्षिततेबाबत काय उपाय योजना या ठिकाणी केल्या होत्या याचीही माहिती आता सातारकरांना उपलब्ध होणे गरजेचे आहे. सोनगाव कचरा डेपोच्या आगीमुळे अनेक प्रश्न चव्हाट्यावर आले आहेत. विशेषता टेंडर प्रक्रिया कशी मॅनेज होते हे सुद्धा आता उघड झाले पाहिजे. कोणा कोणाचे हात या सोनगाव डेपोच्या आगीत भस्म होणार हे सुद्धा सिद्ध झाले पाहिजे. करोडोचा गफला करून मंत्रालयातील आगीची आठवण करून देणाऱ्या या सोनगाव कचरा डेपोतील आगीत कोणी कोणी आपले काळे कृत्य लपविले आहेत.

 याचाही भांडाफोड या निमित्ताने होणे गरजेचे आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या भ्रष्ट यंत्रणेचे पाळेमुळे आता खणून काढली पाहिजे. आगी मागील सत्यता जनतेसमोर येणे गरजेचे आहे. याबाबत नगरसेविका सिद्धी पवार यांनी नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन यंत्रणेतील गलथानपणा निदर्शनास आणून दिला आहे. याबाबत सातारचे नगराध्यक्ष अमोल मोहिते व उपाध्यक्ष अँड डी जी बनकर यांनी गंभीर दखल घेऊन संबंधित यंत्रणेवर गुन्हा दाखल केला. हे योग्य पाऊल टाकले असले तरी हा प्रश्न येथेच संपत नाही. नव्याने लोकनियुक्त झालेल्या प्रतिनिधी पुढे हे एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. भ्रष्ट यंत्रणा दूर करून सोनगाव कचरा डेपोची प्रतिमा उंचावणे हे काम आता पुढील काळात सातारा नगरपालिकेने हाती घ्यावे ही सातारकारांची भावना आहे. 

सोनगावकर जकातवाडीकर नागरिकांचा श्वास गुदमरतोय...

 सोनगाव येथे असलेल्या कचरा डेपो  सोनगावकर व जकातवाडीकर येथील स्थानिक नागरिकांना दुर्गंधीचा सामना करण्याबरोबरच निर्माण होणाऱ्या दूषित वातावरणामुळे त्यांचा श्वास गुदमरतोय.वास्तविक कचरा संकलन पासून वेगवेगळ्या प्रक्रिया करून लोक उपयुक्त प्रकल्प राबविणे शक्य आहे. त्यामुळे रोजगार निर्मिती बरोबर दुर्गंधीलाही आळा बसेल. कचऱ्यापासून खत निर्मिती,इंधन निर्मिती करून उत्पन्न वाढवणे शक्य आहे.त्या माध्यमातून नगरपालिकेचे उत्पन्नही वाढेल असे असताना केवळ भ्रष्ट यंत्रणेला पोसण्यासाठी तर दुर्लक्ष होत नाही ना अशी सातारकरांना आता शंका वाटू लागली आहे. 

 श्रीरंग काटेकर सातारा.‌

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !