देऊळगाव राजात राष्ट्रसंत एकनाथ महाराज लोमटे यांचे भव्य प्रवचन व दर्शन सोहळा

तरुणांना व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी डॉ. रामप्रसाद शेळके यांचा पुढाकार

Grand sermon and darshan ceremony of Rashtrasant Eknath Maharaj Lomate, Buldhana, Shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,बुलढाणा (प्रतिनिधी प्रतिक सोनपसारे)

देऊळगाव राजा: समाजात वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेमुळे तरुण पिढी आणि कुटुंब व्यवस्थेसमोर गंभीर समस्या निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर देऊळगाव राजा येथे राष्ट्रसंत ह.भ.प. गुरुवर्य एकनाथ महाराज लोमटे यांच्या भव्य प्रवचन व दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार, दिनांक १५ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता बस स्टँडजवळील आर्या लॉन्स येथे हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. रामप्रसाद शेळके यांनी केले आहे.

एकनाथ महाराज लोमटे हे राज्यभर आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी प्रसिद्ध असून त्यांच्या प्रवचनातून अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडल्याचे भक्त सांगतात. त्यांच्या आशीर्वादाने अनेकांनी दारू, तंबाखू यांसारख्या व्यसनांचा त्याग करून व्यसनमुक्त जीवनाचा मार्ग स्वीकारल्याचे अनुभवही व्यक्त केले जातात.

आयोजक डॉ. रामप्रसाद शेळके यांनी सांगितले की, समाजात वाढत्या व्यसनाधीनतेमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. तरुण पिढी चुकीच्या मार्गाकडे वळत असल्याने समाजाच्या प्रगतीवरही परिणाम होत आहे. संतांच्या विचारांमधून तरुणांना योग्य दिशा मिळावी, त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल व्हावा आणि त्यांनी समाजोपयोगी कार्यात पुढाकार घ्यावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

संतांच्या सानिध्यातून जीवनाचे खरे मूल्य समजते, आत्मविश्वास वाढतो आणि जीवनाला नवी दिशा मिळते, असा अनुभव अनेक भक्तांनी व्यक्त केला आहे. संतांच्या आशीर्वादामुळे व्यसनाधीनतेमुळे विस्कटलेले अनेक संसार पुन्हा उभे राहिल्याची उदाहरणेही सांगितली जातात.

दरम्यान, संतांच्या प्रवचनातून व्यसनमुक्ती, नैतिकता, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रप्रेम यांचा संदेश मिळणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व प्रवचनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

     -----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !