एसटी महामंडळामध्ये कार्यरत महिलांचा सत्कार

रोटरी क्लब अकोट व्हिजन चा महिला दिनानिमित्त उपक्रम

Women working in ST Corporation felicitated, akot, Akola, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,अकोट (प्रतिनिधी संजय शिरसाट)

 जागतिक महिला दिना चे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ अकोट व्हिजन च्या वतीने एसटी महामंडळामध्ये कार्यरत महिलांचा सत्काराचे आयोजन  अकोट येथे करण्यात आले होते. रात्रंदिवस घराचा संसार सांभाळून लाल परी च्या माध्यमातून प्रवाशांची सेवा करण्याचे कार्य या महिला करीत असतात. अशा धाडसपूर्ण कार्य करीत असताना ते आपली जबाबदारी यशस्वीतेने पार पाडतात. त्यांच्या या कार्याला आमचा सलाम. आम्ही त्यांना मानाचा मुजरा  करतो. अशा या महिलांचा आज आम्ही सत्कार करीत आहोत असे रोटरी क्लब ऑफ अकोट विजन चे अध्यक्ष रो.आनंद भोरे यांनी कार्यक्रमाचे संचालन करताना सागीतले.तर या प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना बसमध्ये असलेली अवाजवी गर्दी आणि चालू बसमध्ये तिकीट बुकिंग चे कार्य असे एक महत्त्वपूर्ण कार्य करण्याचे धाडस या वाहक महिला करीत असतात.

 त्यांना शासनाने काही नियम लावून सुरक्षित करावे असे आवाहन कार्यक्रमाचे अतिथी असिस्टंट गव्हर्नर रो. नंदकिशोर शेगोकार  यांनी केले तर  महामंडळाची अशी ही भारी भर कम ड्युटी करून महिला वाहक लाल परीचे माध्यमातून सेवा करतात त्यांचा सत्कार म्हणजे त्यांना या कार्यासाठी प्रोत्साहन आहे रोटरी क्लब ने राबविलेल्या या उपक्रमाचे भरपूर आभार असे वक्तव्य कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आगार व्यवस्थापक श्री पिसोडे साहेब यांनी केले .महिला वाहक रस्त्यावर बस मध्ये चालतात तेव्हा त्यांना चांगले आणि वाईट दोन्ही अनुभव येतात तरी त्या न घाबरता आपले कार्य जबाबदारीने पूर्ण करतात आणि महामंडळाचे नाव लौकिक करतात असे गौरवपूर्ण उद्गार आकोट आगाराचे प्रभुदास तळोकार यांनी व्यक्त केले .या कार्यक्रमात सर्व महिला कर्मचाऱ्यांना एक मोमेंटो आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

  याप्रसंगी मंचावर अध्यक्ष रो.आनंद भोरे,प्रमुख अतिथी म्हणून आगार व्यवस्थापक श्री पिसोडे साहेब, रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर रो. नंदकिशोर शेगोकार, आगार चे श्री प्रभुदास तळोकार, क्लब चे सचिव अतुल मालानी, अध्यायाच्या प्रथम महिला सौ.अर्चना भोरे, प्रकल्प प्रमुख विजय भोरे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रो. संदीप भुस्कट यांनी तर आभार सचिव रो.अतुल मालानी यांनी मानले.

सत्कार नंतर काही वाहक महीला कर्मचार्यानी आपले अनुभव देत रोटरी क्लब ऑफ अकोट विजन चे आभार मानले.याप्रसंगी क्लबचे माजी अध्यक्ष रो.संजय बोरोडे, रो.अनंतराव काळे सदस्य रो.शिरीषभाई वंजारा,रो.सचिन भुस्कट,रो. संदीप भुस्कट अनंता वसु तसेच रोटरी अँन्स सौ शेगोकार, सौ बोरोडे, सौ काटोले, सौ स्वती चिखले व इतर सदस्य उपस्थित होते

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !