महिलांनी आर्थिक स्वावलंबी होऊन स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे - डॉ. स्वाती थोरात

समाज प्रबोधन सार्वजनिक वाचनालयात 'जागतिक महिला दिन' उत्साहात साजरा

'International Women's Day' celebrated at Samaj Prabodhan Public Library, Satara, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे) 

"परिवर्तन हा समाजजीवनाचा नियम आहे. महिलांनी केवळ घरापुरते मर्यादित न राहता शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि सामाजिक क्षेत्रात हिरीरीने पुढे येणे गरजेचे आहे. ज्यावेळी तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन स्वतःच्या पायावर उभे राहाल, तेव्हाच खऱ्या अर्थाने तुमच्या अस्तित्वाची जाणीव समाजाला होईल," असे प्रतिपादन मलकापूर नगरपरिषदेच्या नगरसेविका व मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉ. स्वाती थोरात यांनी केले.

मलकापूर येथील समाज प्रबोधन सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहनाज शेख होत्या.

     कार्यक्रमाच्या सुरुवातीला वाचनालयाच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेविका डॉ. स्वाती थोरात यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. डॉ. सोनाली थोरात यांनी सोशल मीडियाच्या युगातही 'वाचन' कसे सर्वश्रेष्ठ आहे, यावर प्रकाश टाकला. तर अध्यक्षा शहनाज शेख यांनी महिलांना त्यांच्या हक्कांच्या आणि स्त्रीविषयक कायद्यांची सविस्तर माहिती दिली.

     या सोहळ्याला मुख्याध्यापिका सुलोचना भिसे (प्र. चव्हाण कन्या शाळा), शिला पाटील (विभाग प्रमुख, आदर्श ज्युनिअर कॉलेज), ज्योती शिंदे (मुख्याध्यापिका, आदर्श प्राथमिक विद्यालय) यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच वाचनालयाचे संचालक सुधीर लादे, दत्तात्रय शिर्के, रंजना काटवटे, सविता कोळी यांच्यासह परिसरातील महिला व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल सौ. वैशाली शेवाळे यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय उपाध्यक्षा सुरेखा खंडागळे यांनी करून दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छाया माने यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन लिपिक कोमल पवार यांनी केले.

     -----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !