कष्टकरी हातांना मायेचा आधार - पिंपोडे बुद्रुकची 'बांधकाम कामगार सामाजिक संस्था

कामगार वर्गामध्ये संस्थेबद्दल मोठी आपुलकी आणि विश्वासाचे नाते निर्माण

Construction Workers Social Organization, Satara, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे )

बांधकाम क्षेत्रात राबणाऱ्या कष्टकरी हातांना संघटित करून त्यांच्या आयुष्यात प्रकाशाची किरणे पसरवण्याचे काम पिंपोडे बुद्रुक (ता. कोरेगाव) येथील ‘बांधकाम कामगार बहुउद्देशीय सामाजिक संस्था’ अत्यंत प्रभावीपणे करत आहे. शासनाच्या योजना आणि कामगार यांच्यातील दुवा बनलेली ही संस्था आज खऱ्या अर्थाने कामगारांसाठी 'आधारवड' ठरत आहे.

     अनेक बांधकाम कामगारांना शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती नसते, तर काहींना कागदपत्रांच्या तांत्रिक अडचणींमुळे लाभापासून वंचित राहावे लागते. अशा वेळी संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष सचिन टिके आणि त्यांचे सहकारी कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत आहेत. नोंदणी प्रक्रिया, विमा संरक्षण, शैक्षणिक अर्थसाहाय्य आणि इतर शासकीय लाभांसाठी संस्थेमार्फत सातत्याने पाठपुरावा केला जातो. यामध्ये कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी कामगारांना योग्य दिशा दाखवणे, कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासकीय स्तरावर आवाज उठवणे तसेच केवळ कामापुरते मर्यादित न राहता कामगारांच्या कुटुंबातील सुख-दु:खात सहभागी होणे. या कामांचा समावेश आहे.

     पिंपोडे बुद्रुकमध्ये सुरू झालेले हे कार्य आता केवळ गावापुरते मर्यादित न राहता संपूर्ण सातारा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहे. सचिन टिके यांच्या निस्वार्थी नेतृत्वामुळे कामगार वर्गामध्ये संस्थेबद्दल मोठी आपुलकी आणि विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे. भविष्यातही ही संस्था अधिक व्यापक स्वरूपात कामगारांच्या कल्याणासाठी कार्यरत राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !