विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा होणार गौरव
शिवशाही वृत्तसेवा.सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
समाजाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव करण्यासाठी 'द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य' सज्ज झाला आहे. येत्या ३१ मार्च २०२६ रोजी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत विठ्ठलाच्या पावन नगरीत, म्हणजेच संतराज पॅलेस, विसावा मंदिराशेजारी, पुणे रोड, पंढरपूर येथे भव्य 'राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा २०२६' आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
या सोहळ्यात पत्रकारिता, शिक्षण, आरोग्य, कृषी, कला, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी मानाचे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने विशेष सन्मान: महाराष्ट्र समाज भूषण, जीवन गौरव, महाराष्ट्र रत्न, भारत भूषण. प्रेरणादायी पुरस्कार: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, माता रमाई, उंच माझा झोका (नारीशक्ती). व्यावसायिक व सेवा: आदर्श पत्रकार, आदर्श शिक्षक, सेवा धन्वंतरी भूषण, अभियंता भूषण, आदर्श ग्रामसेवक. साहित्य व कला: साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे, महाकवी वामनदादा कर्डक, कलारत्न, काव्य भूषण. पर्यावरण व शौर्य: वृक्षमित्र, पर्यावरण रक्षक, शौर्य पुरस्कार आणि देशसेवा करणाऱ्या सैनिकांचाही विशेष गौरव करण्यात येणार आहे.
पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्तींनी आपले नाव, पत्ता, कार्याचा थोडक्यात अहवाल, आधार कार्ड, ईमेल आणि फोटो पीडीएफ स्वरूपात २० मार्च २०२६ पूर्वी पाठवणे अनिवार्य आहे. मुदतीनंतर येणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. तसेच अधिक माहितीसाठी पत्रकार पांडुरंग कुंभार किंवा शकील मनियार यांच्याशी ९८६०२७३१३० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




