डॉ. पांडुरंग बाणखेले यांना आर जे न्युज 27 मराठी यांच्याकडून जिवन गौरव पुरस्कार जाहीर
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
तब्बल 41 वर्षाची ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देणारे डॉ. पांडुरंग बाणखेले यांना आर जे न्युज 27 मराठी यांच्याकडून जिवन गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
त्याच बरोबर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादित करून कृषी अधिकारी म्हणून निवड झाल्या बद्दल विद्यालयाची माजी विद्यार्थिनी कु .धनश्री विजय परभाणे यांचा सत्कार करून त्यांच्या यशाचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास काकासाहेब खळडदकर , माजी उपसरपंच देविदास दादा परभाणे, डॉ .सुजित शेलार ,धनंजय ढवळे, भगीरथ परभाणे, आडूरकर सर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक करताना प्राचार्य दिवे सर यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला तर डॉ सुजित शेलार यांनी विद्यार्थ्यांनी या सत्कारमूर्ती कडून प्रेरणा घेत पुढील वाटचाल करावी असे आवाहन केले. तर सत्काराला उत्तर देताना डॉ बाणखेले यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक सल्ला देताना संतुलित आहार व व्यायामाचे महत्व समजावून सांगत त्यांचा खडतर शैक्षणिक वाटचालीतील प्रेरणादायी संघर्षाचे महत्व विषद केले. तर धनश्री परभाणे हिने कष्टाला पर्याय नाही हे सांगताना आपण जर प्रामाणिक प्रयत्न केले तर निश्चित पणे यश मिळते असे सांगत आपल्या जडणघडणीत शाळा व शिक्षकांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काकडे सर यांनी केले तर आभार मगर सर यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वळवी सर, गुंड सर, पावरा सर मेंडके सर, कांडगे सर मेंगाळ सर कुंभार सर,, गोसावी सर, साबळे सर, तिडके सर, गायकवाड सर, झिंगाडे सर सौं पोरे मॅडम, गायकवाड मॅडम,, फनिबंद मॅडम, गौड मॅडम, व सर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




