धोम धरण गाळाने गुदमरले

पाच तालुक्यांच्यी तहाण भागवणाऱ्या धरणातील  तातडीने गाळ काढण्याची मागणी

Dhom Dam filled with silt, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील अत्यंत महत्त्वाचे समजले जाणारे धोम धरण सध्या गाळामुळे गुदमरल्याची परिस्थिती निर्माण झाली असून, त्याचा थेट परिणाम पाणी साठवण क्षमतेवर बरेच वर्षापासून  होत असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. 1972 साली उभारण्यात आलेल्या या धरणातील गाळ अद्यापही काढण्यात आलेला नाही.

धरणाची अधिकृत साठवण क्षमता 13.57 टक्के टीएमसी इतकी असली तरी प्रत्यक्षात ही क्षमता पूर्णपणे उपयोगात येत नसल्याचे दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे धरणाची वास्तविक पाणी साठवण क्षमता लक्षणीयरीत्या घटली आहे. परिणामी भविष्यात पाणीटंचाईचा गंभीर धोका निर्माण होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गेल्या तीन-चार वर्षांत पश्चिम भागात झालेल्या मोठ्या अतिवृष्टीमुळे धरणात प्रचंड प्रमाणात गाळ वाहून आल्याचे चित्र आहे. वेळोवेळी गाळ काढण्याची प्रक्रिया राबवली गेली नसल्याने ही समस्या अधिकच तीव्र झाली आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे आज धरणाच्या मूळ क्षमतेलाच गालबोट लागल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

विशेष म्हणजे, धोम धरण हे केवळ वाई तालुक्यासाठीच नव्हे तर पाच तालुक्यांची तहान भागवणारे जीवनदायी स्रोत म्हणून ओळखले जाते. हजारो शेतकऱ्यांचे शेतीचे प्रश्न, तसेच पिण्याच्या पाण्याच्या गरजा या धरणावर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत धरणाची घटती क्षमता ही अत्यंत चिंतेची बाब ठरत आहे.

धरणातील गाळ तातडीने काढल्यास साठवण क्षमता मोठ्या प्रमाणात वाढू शकते आणि भविष्यातील पाणीटंचाई टाळता येऊ शकते. यामुळे शेती, पिण्याचे पाणी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

तरीही महसूल प्रशासन आणि पाटबंधारे विभाग याकडे गांभीर्याने लक्ष देताना दिसत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. “पाच तालुक्यांची तहान भागवणारे धरणच जर गाळात अडकले, तर जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.

धोम धरण गाळमुक्त करण्यासाठी तातडीने विशेष मोहीम हाती घ्यावी,  प्रशासनाने आता तरी जागे होऊन ठोस उपाययोजना करावी, अन्यथा येणाऱ्या काळात निर्माण होणाऱ्या परिस्थितीस प्रशासनालाच जबाबदार धरले जाईल, असं काही नागरिकांनी मत व्यक्त केले.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !