औषधनिर्माण क्षेत्रातील १००महाविद्यालयातील ५००विद्यार्थ्यांचा सहभाग
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
संजय घोडावत विद्यापीठ अतिग्रे कोल्हापूर येथे १८फेब्रुवारी २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावरील पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत देशभरातील शंभर महाविद्यालयाने सहभाग घेतला होता. नवसंशोधन व नाविन्यपूर्ण कल्पकता यावर आधारित आयोजित केलेले पोस्टर प्रेसेंटेशन (सायन्स स्टार ) या स्पर्धेत आसिया रुस्तुम तांबोळी या विद्यार्थिनी दैदीप्यमान यश प्राप्त करीत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचा गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालयात संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संतोष बेल्हेकर एम फार्मसी चे विभाग प्रमुख डॉ धैर्यशील घाडगे रजिस्टर निलेश पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर म्हणाले की औषधनिर्माण क्षेत्रातील दर्जात्मक शिक्षणाबरोबरच संशोधन क्षेत्रात ही महाविद्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करीत आहे. अंतिम वर्ष एम फार्मसी मधील आसिया रुस्तुम तांबोळी हिने ही परंपरा कायम ठेवली आहे तिच्या संशोधन क्षेत्रातील कार्याचा आम्हाला अभिमान वाटतो. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संतोष बेल्हेकर म्हणाले की क्षयरोग या दुर्धर आजारावर परिणामकारक व प्रभावी नवसंशोधन आसिया रुस्तुम तांबोळी हिने केले असून तिच्या संशोधनाची तज्ञांनी दखल घेतली आहे तिला द्वितीय क्रमांकाने गौरविले आहे. आसिया रुस्तुम तांबोळी या विद्यार्थिनीला प्रा डॉ धैर्यशील घाडगे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व रजिस्टर निलेश पाटील यांनी केले. आसिया तांबोळी हिने मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप उपाध्यक्ष मिलिंद जगताप संचालक डॉ अनिरुद्ध जगताप जयवंतराव साळुंखे आप्पा राजगे प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर यांनी अभिनंदन केले.
नाविन्यपूर्ण संशोधनात्मकतेचा ध्यास घेऊन वाटचाल करणाऱ्या आसिया रुस्तुम तांबोळी या विद्यार्थिनीने अथक परिश्रम घेऊन गुणवत्तेच्या जोरावर आंतरराष्ट्रीय पोस्टर प्रेसेंटेशन (सायन्स स्टार) स्पर्धेत प्राप्त केलेले यश कौतुकास्पद आहे. अर्थात येथील प्राध्यापकांचे लाभलेले अनमोल मार्गदर्शन तसेच अद्यावत व सुसज्ज लॅब ची सुविधा तिला प्राप्त झाल्यामुळेच तिला हे उत्तुंग यश प्राप्त करता आले तिने संस्थेच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे.
मदनराव जगताप
अध्यक्ष
गौरीशंकर नॉलेज सिटी, लिंब सातारा
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




