वाई एमआयडीसीमध्ये कामगारांची पिळवणूक - शिव कामगार सेनेचा गंभीर आरोप

सातारा कामगार आयुक्तांकडे लेखी निवेदन

Exploitation of workers in MIDC, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

वाई एमआयडीसी परिसरातील अनेक कंपन्यांकडून कामगारांची पिळवणूक होत असल्याचा गंभीर आरोप करत शिवसेना शिव कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष  योगेश आनंदराव फाळके यांनी सातारा येथील कामगार आयुक्तांकडे लेखी निवेदन सादर केले आहे.

शिव कामगार सेनेला मिळालेल्या तक्रारीनुसार वाई एमआयडीसी परिसरातील काही कंपन्यांमध्ये कामगारांकडून १२ ते १८ तास काम करून घेतले जात असून त्यांना योग्य मोबदला दिला जात नाही, तसेच शासनाने ठरवलेले किमान वेतन (Minimum Wages) देखील दिले जात नसल्याचे समोर आले आहे.

अनेक ठिकाणी कामगारांना ईएसआय (ESI) आणि पीएफ (PF) सारख्या कायदेशीर सुविधा दिल्या जात नाहीत. कामगारांवर मानसिक दबाव टाकणे, सुरक्षिततेच्या साधनांचा अभाव, तसेच स्थानिक युवकांना रोजगार न देता मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामगारांना कामावर ठेवण्याचा प्रकारही सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

वाई एमआयडीसी परिसरातील अर्थ फाउंड्री, गरवारे, वॉल रोप्स, गरवारे जेल, मालाज इंडस्ट्रीज, भारत पेट्रोलियम, फुल्ट्रोन तसेच इतर काही कंपन्यांविरोधात अशा प्रकारच्या तक्रारी येत असल्याचेही निवेदनात नमूद आहे.

याबाबत तात्काळ चौकशी करून संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई करावी, सर्व कामगारांना किमान वेतन, ईएसआय व पीएफ सुविधा देणे बंधनकारक करावे, तसेच स्थानिक युवकांना रोजगारामध्ये प्राधान्य देण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी शिव कामगार सेनेतर्फे करण्यात आली आहे.

प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास शिवसेना व शिव कामगार सेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही शिव कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष  योगेश आनंदराव फाळके यांनी दिला आहे. 


नितीन कावले साहेब, कामगार आयुक्त सातारा जिल्हा यांची सौजन्य भेट घेऊन वाई एमआयडीसीमधील विविध कंपन्यांमध्ये कामगारांवर होत असलेल्या अन्याय, पिळवणूक व कामगारांच्या हक्कांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

स्थानिक कामगारांना न्याय मिळावा, त्यांना ईएसआय, पीएफ व इतर कायदेशीर सुविधा मिळाल्याच पाहिजेत यासाठी शिवसेना व शिव कामगार सेना आक्रमक भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट केले.

वाई एमआयडीसीमध्ये कामगारांवर अन्याय करणाऱ्या कंपन्यांना आता गय केली जाणार नाही… कामगारांच्या हक्कासाठी लढा अधिक तीव्र केला जाईल!

योगेश फाळके 

उपजिल्हा संघटक, शिवसेना जिल्हाध्यक्ष, 

शिव कामगार सेना सातारा

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !