अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या 5 व्या वर्धापन दिनानिमित्त -नारीशक्ती सन्मान- सोहळ्याचे आयोजन : दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न होणार शाही सोहळा

लोकनेते मा. आ. राजेंद्र राऊत यांची प्रकट मुलाखत

Digital media sampadak patrakar Sangh, digital media editor journalist association, MLA Raja Raut, barshi, Solapur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, बार्शी

पत्रकारितेतील पितामह ज्येष्ठ संपादक, राजकीय विश्लेषक, माध्यम तज्ञ तथा महाराष्ट्र शासनाच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीचे संचालक राजा माने यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा 5 व्या वर्धापन दिनानिमित्त "नारीशक्ती सन्मान" पुरस्कार सोहळा दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते व दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे. सदरील कार्यक्रम दिनांक 30 मार्च 2026 रोजी, सायंकाळी ठीक 6:00 वाजता, देशपांडे व्हेज हॉल, उपळाई रोड, बार्शी या ठिकाणी संपन्न होणार आहे. 

देशातील विविध 7 राज्यांमध्ये कार्यान्वित असलेल्या संघटनेमध्ये 25 हजार सभासद कार्यरत असून, डिजिटल मीडिया तसेच प्रिंट मीडिया मधील संपादक व पत्रकारांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी गेल्या 5  वर्षांपासून ही संघटना कार्यरत आहे. संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत पत्रकारांच्या कुटुंबियांसाठी व पत्रकारांच्या मुला - मुलींच्या शैक्षणिक व वैद्यकीय मदतीसाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबिंब प्रतिष्ठानच्या माध्यमातून 17 लक्ष रुपयांची मदत करण्यात आली आहे. तसेच संघटनेच्या माध्यमातून राज्यभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. 

संघटनेच्या 5 व्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 6 महिलांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये "कीर्तन रत्न पुरस्कार" - ह. भ. प. शिवलीलाताई पाटील ( संस्थापक - विश्वमाऊली आध्यात्मिक मुलींची वारकरी शिक्षण संस्था, बार्शी ), "जीवन गौरव पुरस्कार" - सौ. अनु मोहिते ( सचिव - प्रार्थना बालग्राम अनाथाश्रम व वृद्धाश्रम निवासी प्रकल्प, मोरवंची ), "सामाजिक गौरव पुरस्कार" - सौ. सायरा मुल्ला ( सामाजिक कार्यकर्त्या व नगरसेविका, बार्शी ), "क्रीडा गौरव पुरस्कार" - सौ. मनीषा लोकरे ( संस्थापक - लेडीज हेल्थ क्लब, बार्शी ), "मातृत्व गौरव पुरस्कार" - सौ. सारिका संघवी ( संचालक - भावना कलेक्शन, बार्शी ), "आदर्श महिला वाहक पुरस्कार" - श्रीमती मनीषा गुरव ( वाहक - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ) यांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच याप्रसंगी बार्शीचे माजी आमदार लोकनेते राजेंद्र राऊत यांच्या राजकीय जीवनप्रवासाबाबत संघटनेचे संस्थापक राजा माने प्रकट मुलाखत घेणार आहेत. तर हि मुलाखत घेण्यासाठी मयूर गलांडे व निता देव यांचा सहभाग असणार आहेत. 

संघटनेचे संस्थापक तथा केंद्रीय अध्यक्ष राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून राज्यसभा खासदार ज्योतीताई वाघमारे, धाराशिव लोकसभा खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार दिलीप सोपल, माजी आमदार राजेंद्र राऊत, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शी अशोक सायकर, गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मिरगणे, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, तहसीलदार तहसीलदार एफ. आर. शेख, मुख्याधिकारी तैमुर मुलाणी, गटविकास अधिकारी विवेक जमदाडे, नगराध्यक्ष सौ. तेजस्विनीताई कथले, पंचायत समिती सभापती सौ. मीनाक्षीताई रोंगे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विजय गरड, पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे, संघटनेचे राज्य प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत, राज्य महासचिव विकास भोसले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरी बार्शी शहर व तालुक्यातील सर्व संपादक, पत्रकार बंधू भगिनींनी कार्यक्रमाला उपस्थित राहून, कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशा प्रकारचे आवाहन अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे बार्शी तालुका अध्यक्ष सिद्धार्थ बसवंत व बार्शी तालुका कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !