औषधनिर्माण क्षेत्रातील नाविन्यतेचा ध्यास घेऊन प्राध्यापकांनी नवसंशोधन करावे - मदनराव जगताप

डॉ.माधुरी मोहिते यांना पी. एच.डी.पदवी प्राप्त.गौरीशंकर इन्स्टिट्यूट मध्ये उचित सत्कार

Dr. Madhuri Mohite felicitated at Gaurishankar Institute, Satara, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

मानवी आरोग्याशी निगडित असणारे औषधनिर्माण शास्त्र काळानुसार प्रगल्भ होत असून भविष्यातील वैद्यकीय क्षेत्राची गरज लक्षात घेता या क्षेत्रातील नाविन्यतेचा ध्यास घेऊन प्राध्यापकांनी नवसंशोधन करावे असे मत गौरीशंकरचे अध्यक्ष मदनराव जगताप यांनी व्यक्त केले.ते लिंब ता. जि. सातारा येथील गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन रिसर्च लिंब महाविद्यालयात गौरीशंकरच्या प्राध्यापिका डॉ. माधुरी मोहिते यांनी पी.एच.डी.पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा उचित सत्कार प्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी नितिन मुडलगीकर, जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, प्राचार्य डॉ.संतोष बेल्हेकर, डॉ. भूषण पवार,प्रा रोहन खुटाळे, रजिस्ट्रार निलेश पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.मदनराव जगताप पुढे म्हणाले की महिलांमध्ये गर्भाशय पिशवीला होणाऱ्या कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

या संदर्भात डॉ.माधुरी मोहिते यांनी केलेले संशोधन व प्राप्त केलेली पी.एच.डी. पदवी निश्चितच वैद्यकीय क्षेत्राला पूरक ठरेल.प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर म्हणाले की, वैद्यकीय सेवा क्षेत्रातील गरज पाहता प्रत्येक आजारावर प्रभावी व परिणामकारक ठरणाऱ्या औषध निर्मिती गरजेची आहे.यासाठी नाविन्यपूर्ण संशोधन तितकेच महत्त्वाचे आहे.संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर म्हणाले की सातारा जिल्ह्यात सर्वाधिक पी.एच.डी.पदवी प्राप्त प्राध्यापकांचे ज्ञानकेंद्र म्हणून गौरीशंकरची ओळख असून येथील तज्ञ प्राध्यापकांनी विविध क्षेत्रातील आजारावर प्रभावी संशोधन करून पी.एच.डी. पदवी प्राप्त केल्या आहेत. याचा निश्चित अभिमान आम्हाला आहे.यावेळी प्राचार्य डॉ.संतोष बेल्हेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.डॉ.माधुरी मोहिते यांना डॉ. प्रीती खुलबे यांचे मार्गदर्शन लाभले तर डॉ.  हेमंत के.एस.यादव यांचे सहकार्य लाभले प्रास्ताविक व आभार प्रा गौरी इथापे यांनी केले.

डॉ. माधुरी मोहिते यांना औषधनिर्माण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाच्या बळावर त्यांनी पी.एच.डी.पदवी प्राप्त केली आहे.त्यांनी महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येणाऱ्या गर्भाशय पिशवीच्या कर्करोगावरील संशोधनावर विशेष भर देत नवसंशोधन केले आहे.यामध्ये ताडाच्या झाडांच्या फुलांमधील गुणधर्म व त्याची उपयुक्तता शोधून गर्भाशयाच्या कर्करोगावर अर्कयुक्त पी.एच.संवेदनशील मायक्रोपार्टिकल्सची निर्मिती व मूल्यांकनाच्या आधारे सखोल संशोधन केले आहे.या त्यांच्या संशोधनाची दखल सुरेश ज्ञानविहार जयपुर या नामांकित विद्यापीठाने घेऊन त्यांना पी. एच. डी. पदवीने गौरविले आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !