परिसरातील गावांची धरणासाठी प्रशासनाला आर्त हाक
शिवशाही वृत्तसेवा, वैजापूर (प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी)
वैजापूर तालुक्याचा भौगोलिक विचार केला तर हा तालुका क्षेत्रफळाच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे. या तालुक्याचा विकास कार्यसम्राट आमदार प्रा बोरणारे सरांच्या विचारातून आणि महायुती सरकारच्या काळात होत आहे
वैजापूर मध्ये १६४ गावे आहेत. वैजापूरचा गंगाथडीपट्टा म्हणजे वैजापूर पासून दक्षिणेकडीलची गावे हि जलसमृद्ध आहेत. त्यांना कॅनॉलचे वर्षातून दोन-तीन आवर्तने येतात.
वैजापूर ते शिऊरपर्यंत विचार केला तर हा पट्टा खूप अशा हलक्या जमिनीचा पट्टा आहे . वैजापूर येथील नारंगी सारंगी, दहेगाव येथील बोर दहेगाव प्रकल्प कोल्ही व शिऊर येथील धरणामुळे थोड्याफार प्रमाणात जमिन सिंचनाखाली येते. मन्याड धरण झाल्यामुळे त्या भागातील दहा बारा गावांना त्याचा फायदा झाला. धरणातून पाणी प्रत्येकाच्या शेतात गेल्यामुळे तो भाग थोडाफार सुधारला.
ढेकू नदीवर झालेले भटाणा धरण याचा फायदा त्या परिसरातील गावांना झाला. शिवना नदी असल्यामुळे मनुर पासून ते लासुर पर्यंत असलेल्या गावांना शिवना नदीच्या पाण्याचा फायदा होतो.
पाण्यापासून वंचित राहिला तो डोंगरथडी पट्टा
वैजापूरचे कार्यसम्राट आमदार श्री रमेश बोरनारे सर यांनी विधानसभेत पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न मांडला होता तसेच सातत्याने ते या प्रश्नावर विधानभवनात बाजू मांडत आहे. वाकला ग्रामस्थ प्रा प्रशांत निकम यांच्या मार्गदर्शनाखाली चांदेश्वरी प्रकल्प बाबत ४दिवसीय आमरण उपोषण झाले व आंदोलन झाले.
याचे पडसाद सर्वत्र उमटले परिसरातील २५ गावांचा वाढता प्रतिसाद पाहता तालुक्याचे कार्यसम्राट आमदार श्री बोरणारे सर यांनी दखल घेत उपोषण सोडवले होते. चालू उन्हाळी अधिवेशनात आमदार रमेश बोरनारे सर यांनी चांदेश्वरी प्रकल्पाच्या लक्षवेधी बाबत प्रश्न मांडून सर्वांचे याकडे लक्ष वेधले.
शेतकरी या प्रकल्पाकडे खूप चातकपक्षाप्रमाणे वाट बघत आहे. कारण या प्रकल्पाचा फायदा हा जवळपास २५ गावांना होणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हे वाकला,लोणी खु,तलवाडा, आयणरवाडी, नागवाडी, नायगव्हाण, बाभूळतेल, अंचलगाव, टूणकी, दस्कुली, वळण, तितरखेडा, कविखेडा, बिरोळा, जिरी, मनोली, मनेगाव, सावखेडा, पिंपळगाव, बळ्हेगाव, नांदगाव तालुक्यातील नाशिक जिल्ह्यातील जातेगाव, ढेकू, बोलठाण, कुसुमतेल व कासारी चांदेश्वरी धरण साठवण तलाव झाल्यास २ जिल्ह्यातील व २ तालुक्यातील ही गावे कायमची दुष्काळमुक्त होऊन समृद्ध होऊ शकतात. परंतु महायुती सरकारने या अतिमहत्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचे रूपांतर एका व्यापक चळवळीत होऊ शकते अशी सर्वत्र परिसरात चर्चा आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




