अश्विना डायलिसिस सेंटर रुग्णांना दिलासा देण्यात आघाडीवर राहील-सचिन ननावरे

मान्यवरांच्या हस्ते झाले उद्घाटन

Inauguration of dialysis centre, Wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे) 

सामाजिक भावनेतून केलेला कोणताही उपक्रम दीर्घकाळ टिकतो.डॉ. महेश मेणबुदले यांनी “रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा” या भावनेतून कार्य करत स्पंदन हॉस्पिटलचा नावलौकिक वाढवला असून,त्यांनी सुरू केलेले 'अश्विना डायलिसिस सेंटर' हे डायलिसिस रुग्णांना दिलासा देण्यात आघाडीवर राहील, असा विश्वास वाई तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन ननावरे यांनी व्यक्त केला.

अश्विना डायलिसिस सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महादेव शिवाचार्य महाराज वाईकर होते.दै. पुढारी चे पत्रकार विकास जाधव, डॉ. अभिजीत पाटील, डॉ. रूपाली पवार, डॉ. स्नेहल शिंगटे, डॉ. नाज मकानदार, डॉ. आकांक्षा गायकवाड, श्रीकांत वालेकर, सोमनाथ राऊत, विशाल गाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.महादेव शिवाचार्य महाराज म्हणाले, डॉ. मेणबुदले यांनी ‘दत्तात्रय पांडुरंग मेणबुदले प्रतिष्ठान’च्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत.'माणुसकी'चा धर्म जपणारा व्यक्तीच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो.वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी वृत्ती जपणाऱ्या अशा समाजाभिमुख व्यक्तींची आज समाजाला नितांत गरज आहे.

यावेळी डॉ. महेश मेणबुदले म्हणाले, डायलिसिस रुग्णांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार उपचार मिळावेत, या उद्देशाने अश्विना डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आले आहे.अत्यंत माफक दरात सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असून, जास्तीत जास्त रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !