वाईत बजरंग दलाच्या संयोजकावर प्राणघातक हल्ला - सातारा जिल्ह्यात खळबळ

विश्व हिंदू परिषदेचा संताप -कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

Attack on Bajrang Dal volunteer, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

वाई तालुका बजरंग दलाचे संयोजक निमेश गणेश सदाफुले यांच्यावर गुरुवारी (१२ मार्च) रात्रीच्या सुमारास प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली असून, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वाई येथील परखंदी रोडवरील किवरा ओढ्याच्या पुलाजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये काही जण देशी गाईंच्या कत्तलीसाठी जमल्याची माहिती निमेश सदाफुले यांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी सदाफुले तिथे गेले असता, दबा धरून बसलेल्या समीर पठाण, गफूर पठाण, जुनेद शेख, जहीर शेख आणि साबीर मोमीन यांनी त्यांच्यावर मागून अचानक हल्ला केला. यावेळी कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या घटनेत गंभीर जखमी झालेले निमेश सदाफुले सध्या ICU मध्ये उपचार घेत आहेत. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी घेतलेल्या जबाबाबाबत बजरंग दलाने संशय व्यक्त केला आहे. जखमी सदाफुले शुद्धीवर नसताना पोलिसांनी जबाबात फेरफार केल्याचा खळबळजनक आरोप संघटनेने केला आहे. तसेच, हल्लेखोरांकडे असलेले शस्त्र आणि पिस्तूल जप्त केले का? आरोपींना अटक करून कोर्टात हजर केले का? असे अनेक प्रश्न उपस्थित करत पोलिसांनी या तपासात पारदर्शकता ठेवावी, अशी मागणी केली आहे.

विश्व हिंदू परिषदेने पोलीस उपअधीक्षकांना दिलेल्या निवेदनात आरोपींवर खून करण्याचा प्रयत्न (कलम ३०७), धोकादायक शस्त्राने गंभीर दुखापत (कलम ३२६, ३२४), बेकायदेशीर जमाव व दंगल (कलम १४३, १४७, १४९) तसेच कट रचणे (कलम १२०B) या कलमांनुसार कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

"निमेश सदाफुले हे दीर्घकाळापासून गोरक्षण आणि धर्माचे कार्य करत आहेत. या घटनेमुळे हिंदू बांधवांच्या भावना तीव्र झाल्या असून शहरात अशांतता निर्माण होत आहे. जर पोलिसांनी या प्रकरणी गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई केली नाही, तर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडेल," असा इशारा निवेदवाद्वारे देण्यात आला आहे.

यावेळी नितीन महाजन (पश्चिम महाराष्ट्र बजरंग दल संयोजक), संदेशजी भेगडे (पश्चिम महाराष्ट्र बजरंग दल सहसंयोजक), विजय गाढवे (विश्व हिंदू परिषद सातारा जिल्हा अध्यक्ष), सौ. अश्विनी लाड (दुर्गा वाहिनी जिल्हा संयोजिका), प्रसाद तिताडे (जिल्हा बालोपासन प्रमुख), विराज खंदारे (बजरंग दल सातारा शहर संयोजक), शैलेंद्र सावंत (सातारा जिल्हा गोरक्ष व संवर्धन प्रमुख), अमोल पटवर्धन (विश्व हिंदू परिषद सातारा जिल्हा कार्यकारी सदस्य), प्रतापगड उत्सव समितीचे विवेक भोसले, संदीप घोरपडे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुकाध्यक्ष किशोर भोसले, संतोष काळे, काशिनाथ शेलार, शंभू आडके (बजरंग दल शहराध्यक्ष), शिवसेना (उबाठा) शहर प्रमुख आशिष पाटणे तसेच तालुक्यासह जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

"पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचा कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी. भररस्त्यात झालेला हा हल्ला लोकशाहीला काळिमा फासणारा आहे. भविष्यात अशा समाजकंटकांना जरब बसेल आणि पीडिताला योग्य न्याय मिळेल अशा प्रकारची कारवाई पोलिसांकडून अपेक्षित आहे. आमच्या कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत"

- नितीन महाजन 

(पश्चिम महाराष्ट्र बजरंग दल संयोजक)

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !