वाई एमआयडीसीतील खाद्यपदार्थ उद्योगात अस्वच्छतेचा सुळसुळाट

 अन्न भेसळ विभागाचे दुर्लक्ष की संगनमत?

Unsanitary conditions in food industry in MIDC, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )

वाई एमआयडीसी व वाई तालुक्यातील परिसरात मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थ निर्मिती करणाऱ्या कंपन्या कार्यरत असून, या कारखान्यांमध्ये भीषण अस्वच्छतेचे चित्र दिसून येत आहे. परप्रांतीय कामगारांच्या माध्यमातून तयार होणारे फास्ट फूड, मसाले, कढीपत्ता, चटण्या व इतर पदार्थ थेट नागरिकांच्या ताटात जात असून, हे पदार्थ कोणत्या परिस्थितीत तयार होतात याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

अनेक कारखान्यांमध्ये उघड्यावर कढीपत्त्याची पाने सुकवणे, घाणेरड्या पाण्यात भाजीपाला धुणे, कामगारांकडे हातमोजे, टोपी किंवा स्वच्छतेचे कोणतेही साधन नसणे, जमिनीवरच पदार्थ प्रक्रिया करणे असे प्रकार सर्रास सुरू आहेत. काही ठिकाणी तर उंदीर, माशा आणि दुर्गंधी यामध्येच खाद्यपदार्थ तयार केले जात असल्याचे चित्र आहे.

या संपूर्ण प्रकारात सर्वात गंभीर बाब म्हणजे महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI) यांचे पूर्णतः दुर्लक्ष. वर्षानुवर्षे तक्रारी होऊनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

"अन्न भेसळ विभाग झोपलेला आहे की मुद्दाम डोळेझाक करत आहे?" असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक दबक्या आवाजात नव्हे तर उघडपणे करत आहेत. परप्रांतीय मालकांच्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय मजूर कार्यरत असून, कोणतेही आरोग्य तपासणी प्रमाणपत्र, प्रशिक्षण किंवा स्वच्छतेचे नियम पाळले जात नाहीत.

या अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून, फूड पॉइझनिंग, संसर्गजन्य आजार, पोटाचे विकार यासारख्या समस्या भविष्यात मोठ्या प्रमाणात वाढू शकतात.

वाई एमआयडीसीतील या खाद्यपदार्थ कारखान्यांवर तात्काळ छापे टाकून: परवाने रद्द करणे उत्पादन जप्त करणे संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करणे

कारखाने सील करणे अशी कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

जर अन्न भेसळ विभागाने तातडीने पावले उचलली नाहीत, तर भविष्यात होणाऱ्या कोणत्याही आरोग्यविषयक दुर्घटनेला प्रशासनच जबाबदार राहील, असा थेट इशाराही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

वाई एमआयडीसी – उद्योगांचे नव्हे तर नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अस्वच्छ कारखान्यांचे केंद्र बनत चालले आहे का? हा प्रश्न आता प्रशासनासाठी गंभीर इशारा ठरत आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !