पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याचा शेतकऱ्यांचा संतप्त आरोप
शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )
धोम धरणाच्या दोन्ही बाजूंना वसलेल्या अनेक गावांमध्ये सध्या चोरट्यांचा अक्षरशः धुमाकूळ सुरू असून, लाखो रुपयांच्या केबल, मोटारी व विद्युत वितरणाचे डीपी दिवसाढवळ्या चोरीला जात आहेत. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी होऊनही पोलिसांना आजतागायत एकाही चोराचा ठोस थांगपत्ता लागलेला नाही, ही बाब अत्यंत गंभीर असून पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. वर्षानुवर्षे चालत आलेला हा चोर-पोलीस खेळ आता दिवसेंदिवस अधिकच वाढत चालला आहे. शेतीसाठी कर्ज काढून पाणीपुरवठ्याच्या योजना उभ्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोरच त्यांच्या मोटारी, केबल व डीपी चोरीला जात आहेत. आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांवर हा दुहेरी आघात ठरत असून, अनेक शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत.
परवा वेलंग येथे एकाच गावातील शेतकरी कृष्णदेव जाधव सुनील जाधव भैरवनाथ पाणीपुरवठा सिद्धेश्वर पाणीपुरवठा दत्ता जेधे या शेतकऱ्यांच्या पाणीपुरवठ्याच्या केबल चोरीला गेले असून अजूनही दहा ते पंधरा शेतकऱ्यांच्या केबल चोरीला गेल्या आहेत त्याचा थांब पत्ता पोलिसांना लागलेला नाही असे प्रकार अनेक वेळा घडलेले आहेत वर्षानुवर्ष पोलिसांचा चोर पोलीस खेळ चालू आहे व. ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठ्याचे साधनच हिरावून गेल्याने संबंधित शेतकऱ्यांची परिस्थिती अक्षरशः बिकट झाली आहे. व शेतातील पिके वाळून चालले आहेत एकाच गावात इतक्या मोठ्या प्रमाणात चोरी होणे हे पोलिसांसाठी मोठे आव्हान असताना, पोलीस मात्र अजूनही येरे माझ्या मागल्या अशाच भूमिकेत असल्याची शेतकऱ्यांची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
या सर्व प्रकारामुळे पश्चिम भागातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून, वाई पोलिसांच्या तपास यंत्रणेवरील विश्वास उडाल्याने सातारा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्याची तयारी सुरू आहे. पोलीस अनेक नागरिकांचे लाखो रुपयांचे मोबाईल शोधून देऊ शकतात परंतु कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या केबल चोरांना पकडून देऊ शकत नाहीत शेतकऱ्यांचे स्पष्ट म्हणणे आहे की, हा चोर-पोलीस खेळ तात्काळ थांबवला नाही, तर अनेक शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. शेतकऱ्यांनी चोरीला गेलेल्या केबल च किमती लाखो रुपयांच्या घरात आहेत एवढे किमतीची केबल आणायची कशी असा सवाल शेतकऱ्यांना पडलेला आहे अगोदरच शेतकऱ्यांनी बँकांची कर्ज घेऊन पाणीपुरवठा योजना निर्माण केलेल्या आहेत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, अनेक वेळा शेतकरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता, तेथील कर्मचारी उलट त्यांच्याशीच अरेरावीची दमबाजीची भाषा करतात, संशयाच्या नजरेने चौकशी करतात, आणि शेवटी शेतकरीच अपमानित होऊन परततो.
त्यामुळे अनेक शेतकरी आता पोलीस ठाण्यात तक्रार देण्यालाच घाबरू लागले आहेत थांबा वेळ जाईल तुम्हाला दम निघत नाही का अशी उत्तर शेतकऱ्यांना ऐकावी लागतात हे पोलीस जनतेचे सेवक आहेत का नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे खलनिग्रहणाय सदरक्षणाय पोलिसांच्या ब्रीदवाक्याचा विसर पडलेला वाई पोलिसांना दिसत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे विशेषता वाई पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप होत असून, या ठाण्याच्या हद्दीत चोरीचे प्रकार सातत्याने घडत असतानाही ना ठोस कारवाई, ना परिणामकारक तपास दिसून येत आहे.
ना पोलीस अधीक्षकांचे लक्ष, ना वरिष्ठ अधिकाऱ्यांची दखल अशीच परिस्थिती सध्या तरी दिसत आहे.
कधी कधी पोलिसांकडून “चोर पकडला”, “माल जप्त केला” अशी माहिती दिली जाते, पण ती ना बातमीत दिसते, ना त्या चोराला प्रत्यक्षात शिक्षा झालेली कुणी पाहिलेली आहे. ना कुठल्या पोलीस अधिकाऱ्याने पत्रकारांना प्रेस नोट दिली आहे असा चोर पोलीस प्रकार व पोलीस ठाण्यात सर्रास चालू आहे म्हणजे चोर फक्त कागदावर पकडले जातात का, असा संशय शेतकऱ्यांमध्ये बळावत आहे. जर हे केबल चोरी, मोटार चोरी, डीपी चोरीचे प्रकार असेच सुरू राहिले, तर केवळ शेतकऱ्यांचेच नव्हे तर पोलीस प्रशासनाच्या विश्वासार्हतेचेही मोठे नुकसान होणार आहे. आज प्रश्न स्पष्ट आहे चोर दिसतायत, पण पोलीस दिसत नाहीत. लाखोंचा माल जातोय, पण कारवाई शून्य. मग हा चोर-पोलीस खेळ नेमका केव्हा थांबणार आणि शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या चोरांना आखेर कोण रोखणार.
वाई शहरांमध्ये झालेल्या नगरपरिषद व जिल्हा परिषद निवडणुकीत अनेक दिग्गज नेते येऊन वाई तालुक्यासह शहरांमध्ये भाषण ठोकून गेले परंतु वाई शहरातील कायदा सुव्यवस्था याबाबत कुठलेही नेत्याने व कार्यकर्त्यांनी या भाषण ठोकणाऱ्या एकाही मंत्र्याला सांगितलं नाही याची खंत व सल सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळत असून शेतकऱ्याला कोणी वाली राहिले का नाही असा प्रश्न आता कर्जबाजारी सर्वसामान्य शेतकरी विचारत आहे.
अंतरवाली सराटी येथे मराठा क्रांती मोर्च्याच्या कार्यकर्त्यांवर अमानुष लाठी चार्ज करणारे व संशयाच्या भवर्यात अडकलेले व तातडीने पुणे येथे बदली केलेले व पुण्यातून साताऱ्यात नेमणूक होऊन आलेले पोलीस अधीक्षक तुषार दोषी या चोर पोलीस खेळातील दोषींवर कारवाई करणार का व अंतरवाली सराटी येथे जशी दाखवलेली कार्यतर पडता तीच साताऱ्यात दाखवणार का
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



