अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई
शिवशाही वृत्तसेवा,सातारा ( प्रतिनिधी शुभम कोदे )
सातारा जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आणि त्याची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली. वाई येथील काही तरुण लोणंद बसस्थानक परिसरात देशी बनावटीची पिस्तुलं आणि जिवंत काडतुसे विकण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून प्राप्त झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे आणि रोहित फार्णे यांच्या पथकाने लोणंद बसस्थानक परिसरात सापळा लावून एका मारुती सुझुकी एर्टिगा कारला (क्रमांक MH-12-NE-9210) अडवले. या कारवाईत पोलिसांनी निखिल शिवाजी मोरे (२८, रा. गंगापुरी), आयुष चंद्रकांत अडसुळ (२०, रा. रविवार पेठ), यश बबन चव्हाण (२१, रा. बावधन), नितीन दत्ता वाडकर (२८, रा. बावधन) आणि सनी काशिनाथ भोसले (३४, रा. खानापूर) या पाच आरोपींना ताब्यात घेतले.
आरोपींच्या झडतीमध्ये पोलिसांना ३ देशी बनावटीची पिस्तुलं, ५ जिवंत काडतुसे आणि ६ मोबाईल हँडसेट मिळून आले. पोलिसांनी ही शस्त्रे, मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली एर्टिगा कार असा एकूण १२ लाख ६७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या पाचही आरोपींविरुद्ध लोणंद पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम (सुधारित) २०१९ च्या कलम ३, ७, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या यशस्वी कारवाईबद्दल
पोलीस अधीक्षक सातारा तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक सातारा डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, पोलीस अंमलदार आतिश घाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, शरद बेबले, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, स्वप्नील शिंदे, अरुण पाटील, गणेश कापरे, अविनाश चव्हाण, अमित सपकाळ, स्वप्नील कुंभार, अमित माने, ओंकार यादव, मोहन पवार, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव, रोहित निकम, सचिन ससाणे, रविराज वर्णेकर यांनी सहभाग घेतला असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी सहभागी अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




