वाई जनता अर्बन बँकेत परिवर्तन - तीस वर्षांच्या एकहाती सत्तेला सुरुंग‌ - पंचवार्षिक निवडणुकीत परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय

खा. नितीन पाटील यांच्या नेतृत्वातील परिवर्तन पॅनलचे सर्व उमेदवार विजयी
Vayu janatha urban Bank election result, Parivartan panel victory, MP Nitin Patil, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
वाई येथील प्रतिष्ठित वाई जनता अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सोमवारी (दि. २१) ऐतिहासिक सत्ता परिवर्तन झाले. खासदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखालील ‘परिवर्तन पॅनेल’ने सर्व जागांवर दणदणीत विजय मिळवत संस्थापक पॅनेलचा दारुण पराभव केला. या निकालामुळे गेल्या ३० वर्षांपासून बँकेवर वर्चस्व गाजवणारे संस्थापक पॅनेलचे नेते सुरेश कोरडे यांची एकहाती सत्ता संपुष्टात आली आहे.

५४ टक्के मतदान आणि १५०० हून अधिक मताधिक्य
संचालक मंडळाच्या एकूण ११ जागांपैकी भटक्या-विमुक्त जाती-जमाती (NT) राखीव जागेवरून तात्याबा बबन धायगुडे (वाघोशी, ता. खंडाळा) यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली होती. उर्वरित १० जागांसाठी रविवारी (दि. २०) मतदान पार पडले. यामध्ये एकूण ५,२७८ सभासदांनी (५४ टक्के) आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता.

​सोमवारी येथील प्रशासकीय इमारतीतील सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी अनिल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय वेघले, स्वप्नील माळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण केली. मतमोजणीच्या फेरीनिहाय निकालात परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांनी सुरुवातीपासूनच तब्बल १५०० ते १६०० मतांची भक्कम आघाडी घेतली आणि अखेरपर्यंत ती टिकवून ठेवत सर्वच्या सर्व जागांवर निर्भेळ यश मिळवले.

विजयी उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते:
१. शेखर फरांदे (ओझर्डे) – ३,५५७ मते
२. निळकंठ मोरे (पाचवड) – ३,५५७ मते
३. वैशाली नीलेश चव्हाण (सुरूर) – ३,४०७ मते
४. अजय गायकवाड (कडेगाव) – ३,३४७ मते
५. बाळकृष्ण सपकाळ (यशवंतनगर) – ३,३२८ मते
६. राहुल डेरे (कवठे) – ३,१८३ मते
७. रेखा संतोष पिसाळ (व्याजवाडी) – ३,१८४ मते
८. तानाजी जाधव (विठ्ठलनगर खेड-सातारा) – ३,१७६ मते
९. सुभाष नवले (सातारा) – ३,१५० मते
१०. महेंद्र जमदाडे (फुलेनगर) – २,७२५ मते
​(तात्याबा बबन धायगुडे यांची आधीच बिनविरोध निवड झाली आहे.)

​गुलालाची उधळण अन् आतषबाजी
निकालाची अधिकृत घोषणा होताच परिवर्तन पॅनेलचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी प्रशासकीय इमारतीच्या आवारात गुलालाची उधळण करत आणि जोरदार फटाक्यांची आतषबाजी करत मोठा जल्लोष साजरा केला.
​सभासदांनी परिवर्तनाच्या बाजूने दिलेला हा स्पष्ट कौल सुरेश कोरडे यांच्या तीन दशकांच्या वर्चस्वाला पूर्णविराम देणारा ठरला आहे. या विजयामुळे वाई जनता अर्बन बँकेच्या राजकारणात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली असून, नवनिर्वाचित संचालक मंडळ बँकेच्या भविष्यातील कारभाराला कोणती नवी दिशा देते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !