गणेश मंडळांना प्रसाद साहित्याची सस्नेह भेट - नगराध्यक्ष अनिल सावंत मित्र समूहाचा स्तुत्य उपक्रम

सत्यनारायण पूजेनिमित्त उपक्रमाचा शुभारंभ
Prasad package gifts, Ganesh utsav mandal, Mayor Anil Sawant, Wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे) 
वाई - गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याचा सण आहे. याच भावनेतून वाईचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अनिल लक्ष्मणराव सावंत यांच्या अनिल सावंत मित्र समूहाच्या वतीने वाई शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांना श्री सत्यनारायण पूजेनिमित्त सस्नेह प्रसाद साहित्य भेट देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या उपक्रमाचा शुभारंभ ज्योतिबा मंदिर, सोनगीरवाडी, वाई येथे भक्तिमय वातावरणात करण्यात आला. गणेशोत्सवाच्या काळात शहरातील गणेश मंडळांच्या कार्याला प्रोत्साहन मिळावे, मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी आपुलकीचे नाते अधिक दृढ व्हावे तसेच गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा आणि बंधुभाव वृद्धिंगत व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

गणेश मंडळांना प्रसाद साहित्याची भेट देणे हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून ‘आपला गणपती, आपला उत्सव आणि आपली माणसं’ या जिव्हाळ्याच्या भावनेतून निर्माण होणारा स्नेहबंध आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या उपक्रमात वाई नगरपरिषदेचे उपाध्यक्ष, शहराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविका यांनी सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. 

वाई शहरातील सर्व दैविक भक्त, नागरिक आणि गणेशभक्तांना अनिल लक्ष्मणराव सावंत, लोकनियुक्त नगराध्यक्ष, वाई नगरपरिषद, वाई तसेच अनिल सावंत मित्र समूहाच्या वतीने गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !