सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभेत ओंकार साखर कारखान्याच्या ८७८ कोटींच्या कर्जाची चौकशीची मागणी

अ‍ॅड. दीपक पवार यांनी प्रशासक कुंदन भोळे यांना धरले धारेवर
DCC Bank bonus loan, dipak pawar, Solapur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सोलापूर (वैभव कुलकर्णी)
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (डीसीसी) वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (२० सप्टेंबर) प्रचंड गदारोळात आणि वादळी ठरली. “बँक ही मूळची शेतकऱ्यांची असताना, स्थानिक सेवा संस्थांवर कर्जाच्या मर्यादा लादल्या जातात आणि बाहेरून आलेल्या खाजगी उद्योजकांना मात्र शेकडो कोटींचे कर्ज कसे दिले जाते?” असा संतप्त सवाल करत वसुंधरा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था (जैनवाडी, ता. पंढरपूर) चे चेअरमन अ‍ॅड. दीपक दामोदर पवार यांनी बँकेचे प्रशासक कुंदन भोळे यांना जोरदार धारेवर धरले.

​अ‍ॅड. दीपक पवार यांनी बँकेचे प्रशासक कुंदन भोळे यांच्याकडे निवेदनाद्वारे ओंकार साखर कारखाना आणि त्याच्या ग्रुपला दिलेल्या तब्बल ८७८ कोटींच्या कर्जवाटपाच्या संपूर्ण चौकशीची तसेच कागदपत्रांची अधिकृत मागणी केली आहे.

प्रश्नांची सरबत्ती आणि मुख्य मागण्या
​अ‍ॅड. दीपक पवार यांनी सभेत व निवेदनातून प्रशासकांसमोर खालील प्रमुख मुद्दे आणि प्रश्न उपस्थित केले:

​८७८ कोटींच्या कर्जाचा हिशोब द्या: ओंकार साखर कारखाना आणि त्यांच्या ग्रुपला बँकेकडून आजतागायत एकूण किती कर्ज पुरवठा करण्यात आला? त्यापैकी किती कर्ज परतफेड झाले, थकबाकी किती आहे आणि तारण घेतलेल्या मालमत्तांचा सविस्तर तपशील काय? याची सर्व कागदपत्रे सार्वजनिक करण्यात यावीत.

​सेवा संस्थांवरील २० लाखांची अन्यायकारक मर्यादा: नवीन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना कर्ज वाटपासाठी दरवर्षी केवळ २० लाख रुपयांचीच कमाल मर्यादा घातली जाते. ही मर्यादा कधी वाढवणार आणि मागणीनुसार कर्ज पुरवठा करण्यात कोणत्या अडचणी आहेत, याचा उलगडा करावा. तसेच या वर्षाची मंजूर झालेली २० लाखांची रक्कम अद्याप वितरित का झाली नाही?

​खाजगी उद्योगांना दिलेल्या कर्जाची थकबाकी किती?: शेतकरी व विकास संस्थांव्यतिरिक्त दुग्ध संस्था, खाजगी व सहकारी साखर कारखाने तसेच इतर उद्योगांना बँकेने वितरित केलेल्या एकूण कर्जाची, त्यांच्या वसुलीची सद्यस्थिती काय आहे? आणि त्यामध्ये थकबाकीचे प्रमाण किती आहे, याचे तपशील द्यावेत.

चुका आढळल्यास दुरुस्ती करण्याचे प्रशासकांचे आश्वासन
​अ‍ॅड. दीपक पवार यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर सभेत जोरदार चर्चा रंगली. यावर उत्तर देताना प्रशासक कुंदन भोळे यांनी संबंधित कर्जप्रकरणाची संपूर्ण कागदपत्रे आणि सविस्तर माहिती उपलब्ध करून दिली जाईल, असे स्पष्ट केले. तसेच नियमबाह्य किंवा चुकीचे कर्ज वाटप झाल्याचे आढळल्यास त्यामध्ये योग्य ती दुरुस्ती केली जाईल, असे आश्वासन प्रशासकांनी दिले.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !