दिल्लीच्या पथसंचलनात वाई ची मोहोर

अमरीन इनामदारचा वाई अर्बन बँकेतर्फे यथोचित गौरव

The popularity of the Y in Delhi's traffic, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे) 

प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथील कर्तव्यपथावर झालेल्या संचलनात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चित्ररथाचे यशस्वी नेतृत्व करून अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या वाईची कन्या कु. अमरीन आजीम इनामदार हिचा 'दि वाई अर्बन को-ऑपरेटिव्ह बँके'च्या वतीने विशेष गौरव करण्यात आला. बँकेच्या संचालिका व नूतन नगरसेविका ज्योती गांधी यांच्या हस्ते अमरीनला सन्मानित करण्यात आले.

 या छोटेखानी परंतु दिमाखदार सोहळ्याला बँकेचे अध्यक्ष अनिल देव, उपाध्यक्ष डॉ. शेखर कांबळे यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

 याप्रसंगी बोलताना उपाध्यक्ष डॉ. शेखर कांबळे म्हणाले की, "प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होणे हे प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते. अमरीनने केवळ सहभागच नोंदवला नाही, तर महाराष्ट्राच्या चित्ररथाचे नेतृत्व करून वाईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. महाराष्ट्राचा चित्ररथ देशात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला, ही बाब आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. अमरीनने वाईची गुणवत्तेची परंपरा जागतिक स्तरावर नेली आहे."

 बँकेचे अध्यक्ष अनिल देव यांनी अमरीनच्या जिद्दीचे कौतुक करताना सांगितले की, "किसनवीर महाविद्यालयात एम.ए. चे शिक्षण घेणारी अमरीन एका सामान्य कुटुंबातून येते. अत्यंत कष्टातून आणि सरावातून तिने हे यश मिळवले आहे. तिच्या या कर्तृत्वामुळे ग्रामीण भागातील इतर विद्यार्थ्यांनाही मोठी प्रेरणा मिळेल."

 यावेळी बँकेचे संचालक रमेश ओसवाल, ॲड. बाळासाहेब पंडित, मकरंद मुळे, विवेक पटवर्धन, माधव कान्हेरे, काशिनाथ शेलार, महेश राजेमहाडिक, चंद्रकांत गुजर, प्रीतम भुतकर, स्वप्निल जाधव तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर काळे व सरव्यवस्थापक संतोष बागुल यांनी अमरीनचे अभिनंदन करून तिला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

      -----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !