मलकापुरात रंगला शिवरायांच्या शौर्याचा आविष्कार
शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
कराड येथील रोटरी क्लब ऑफ मलकापूर आणि रोटरॅक्ट क्लबच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 'भव्य रोटरी चित्रकला स्पर्धा २०२६' चा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. “रंगांच्या माध्यमातून शिवविचार पेरूया, सेवाभावाने समाज घडवूया” या मंत्रासह शेकडो विद्यार्थ्यांनी आपल्या कुंचल्यातून शिवचरित्रातील जिवंत प्रसंग कागदावर साकारले.
स्पर्धेत लहान गटापासून ते खुल्या गटापर्यंतच्या स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. विद्यार्थ्यांनी केवळ चित्रं काढली नाहीत, तर स्वराज्याचा इतिहास जिवंत केला. यामध्ये प्रामुख्याने शिवजन्म सोहळा प्रतापगडावरील अफझलखान वध, किल्ले रायगडावरील सुवर्ण राज्याभिषेक, गड-कोट आणि मावळ्यांचे शौर्य
यांसारख्या विषयांवर आधारित कलाकृतींनी उपस्थितांची मने जिंकली. परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या रंगसंगतीचे आणि ऐतिहासिक अचूकतेचे विशेष कौतुक केले.
स्पर्धेतील प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच, सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला सहभाग प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहित करण्यात आले.
या सोहळ्याच्या यशासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. राहुल जामदार, सचिव रो. विजय दुर्गावळे आणि प्रोजेक्ट चेअरमन रो. उमेश यादव यांनी अथक परिश्रम घेतले. क्लबच्या सर्व सदस्यांच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे या स्पर्धेने एक वेगळी उंची गाठली आहे.
मलकापूर परिसरातील पालक आणि शिक्षकांकडून रोटरी क्लबच्या या उपक्रमाचे मोठे कौतुक होत असून, "सेवा आणि कला" यांचा हा संगम खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरला आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




