हर हर महादेवच्या जयघोषाने परिसर दुमदुमला
शिवशाही वृत्तसेवा,शिरूर(प्रतिनिधी फैजल पठाण)
“शिरूर नगरीत सुरू असलेल्या या शिवमहापुराण कथेला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. धार्मिक वातावरणात हर हर महादेवच्या जयघोषाने परिसर दुमदुमला आहे. हा अध्यात्मिक सोहळा १ मार्चपर्यंत दररोज दुपारी १ ते ४ या वेळेत सुरू राहणार आहे. तरी सर्व भाविकांनी या पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेऊन कथा श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रसिद्ध उद्योगपती व कथेचे आयोजक प्रकाश धारिवाल व पी आर धारिवाल फाउंडेशन यांनी केले आहे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील प्रभू श्रीराम यांनी स्थापित केलेल्या शिवलिंगच्या दर्शन घेण्यासाठी भाविकांनीआवश्य यावे असे आवाहन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक पं. आचार्य प्रदीपजी मिश्रा(सीहोरवाले)यांनी केले.
शिरूर परिसरात भक्तीचा महासागर उसळला असून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक पं. आचार्य प्रदीपजी मिश्रा (सीहोरवाले) यांच्या अमृतवाणीमधून रं श्री शिव महापुराण कथेस सुरुवात झाली. दि. २४ फेब्रुवारी ते दोन मार्च २०२६ या कालावधीत दररोज दुपारी १ ते ४ या वेळेत हा अध्यात्मिक सोहळा पार पडत आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




