राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची 150 जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजन
शिवशाही वृत्तसेवा,सातारा( प्रतिनिधी शुभम कोदे )
जीवनात शिक्षणाचे महत्व, अंधश्रद्धा निर्मुलन, व्यसनमुक्ती, या बाबत कठोर प्रबोधन करणारे गाडगे बाबा हे मानवतेचे पुजारी होते. असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत प्रा. श्रीधर साळुंखे यांनी कामाठीपुरा सातारा येथे बोलताना केले,
राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त संत गाडगेबाबा समाज सेवा संस्था सातारा व जिल्हा लॉंड्री संघटना यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रा.श्रीधर साळुंखे बोलत होते,याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक कल्याण राक्षे तर अध्यक्षस्थानी जेष्ठ मार्गदर्शक भिकू राक्षे होते
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की मानवसेवा हीच माधवसेवा माननारे, त्यासाठी दवाखाने, धर्मशाळा व अन्नछत्र चालविणारे बाबा हे दृष्टे आणि कृतीशील समाज सेवक होते.
अखिल मानवजातीसाठी कार्य करणाऱ्या संतांना जातीच्या चौकटित बंदिस्त करणे म्हणजे त्यांच्या आकाशा एवढ्या कार्य कर्तृत्वाला खुजे करणेच ठरते.
बाबांनी सेवेसाठी सांगितलेली दशसुत्री ही मानवोद्धाराची आचार संहिताच आहे.
बाबांनी आचरलेला निष्काम कर्मयोग, निरपेक्ष सेवाधर्म, आणि चारित्र्य संपन्न निर्व्यसनीपणा आज आम्ही अंगिकारणे हीच त्याच्या जीवनकार्याल दिलेली मानवंदना ठरेल.असेही प्रा. श्रीधर साळुंखे म्हणाले,
यावेळी नुकत्याच झालेल्या नगरपालिका व जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या समाजातील नवनिर्वाचित सदस्यांचा तसेच आदर्श पोलीस पाटील प्रवीण राक्षे,आदर्श एसटी ती महामंडळ अधिकारी अशोकराव कोकाटे आदर्श मार्केट कमिटी अधिकारी चेतन पिसाळ यांचा गौरव करण्यात आला,
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष दिलीपराव काटकर लॉड्री संघटनेचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत शेडगे व महेश सुळे यांनी केले,प्रस्ताविक उपाध्यक्ष सौ माणिक हजारे यांनी केले,आभार पत्रकार जयवंत पिसाळ यांनी तर सूत्रसंचालन प्रा. बाळासाहेब काटकर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जेष्ठ मार्गदर्शक अरविंद शेडगे,सरचिटणीस हणमंतराव साळुंखे,उपाध्यक्ष अरविंद राक्षे,वसंतराव गहिने ,संतोष राक्षे यांनी परिश्रम घेतले.
संत गाडगेबाबा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर घेण्यात आले यात समाजबांधव व तरुण वर्ग यांनी 150 बॅग संकलित करण्यात आल्या,तर जिल्हाभरात 150 ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून कृतीतून जयंती साजरी करण्यात आली असे अध्यक्ष दिलीप काटकर यांनी सांगितले.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




