कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एनएसएस विभागाने विशेष प्रयत्न
शिवशाही वृत्तसेवा,कन्नड ( प्रतिनिधी मनोज चव्हाण )
कन्नड : आजच्या 21 वे युग हे गतिमान युग म्हणून ओळखल्या जाते, या पार्श्वभूमीवर आपण शाश्वत मूल्यांची जपवणूक करणे खूप गरजेचे आहे; शाश्वत विकासासाठी तरुणांची भूमिका या ठिकाणी सर्वात महत्त्वाची मानली जाते असे प्रतिपादन डॉ. सुनील गोरडे अर्थशास्त्र विभागप्रमुख शिवाजी महाविद्यालय कन्नड यांनी
मौजे दाभाडी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष शिबिरांतर्गत पाचव्या दिवशी दुपारच्या सत्रात "शाश्वत विकासात युवकांची भूमिका" या विषयांवर व्याख्यान देत असताना सांगितले. तत्पूर्वी सकाळच्या सत्रात मौजे दाभाडी गावाच्या मुख्य रस्त्या पासून ते गावापर्यंत एनएसएस विभागातर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले, स्वयंसेवकांनी गावाच्या मुख्य पारावर बसलेल्या गावकऱ्यांशी हितगुज करून त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर महिलांच्या आरोग्याची काळजीच्या दृष्टीने ग्रामीण रुग्णालय कन्नड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिलांचे आरोग्य विषयक शिबिर घेण्यात आले त्यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे श्री समाधान काकडे, वाहब पटेल, विकास पडवळ, अभिजीत पोतरे व त्यांचे सर्व सहकारी यांनी महिलांचे आरोग्य विषयी शारीरिक चाचणी घेतली त्यात रक्तगट, हिमोग्लोबिन, ॲनिमिया इत्यादीची तपासणी करण्यात आली, जवळपास 35 ते 40 महिलांनी सहभाग नोंदवला ग्रामीण रुग्णालयातर्फे महिलांना रक्त वाढीसाठी औषधी देखील देण्यात आल्या होत्या.
डॉ. सुनील गोर्डे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना सांगितले की, "भावी पिढीच्या विकासासाठी होणाऱ्या नैसर्गिक संसाधनाची जी हानी होत आहे ती होता कामा नये कारण येणाऱ्या पिढीला गरज आहे" असे मत त्यांनी व्यक्त केले आपल्या अध्यक्षीय समारोपात प्रा मदन खुर्दे यांनी सांगितले की, "शाश्वत मूल्यांची जर आपण जपवणूक केली नाही तर देशातील तरुण हा दिशाहीन होईल व त्याला नैसर्गिक संसाधनाबद्दल माहिती होणार नाही करिता त्याने त्याचं गांभीर्य ठेवावे" असे मत व्यक्त केले,
त्यानंतर गावातील महिलांसाठी पाककला कृतीची स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये गावातील वीस ते पंचवीस महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून विविध कलाकृती सादर केल्या व त्याचा आस्वाद सर्व स्वयंसेवक यांनी घेतला, या कार्यक्रमास गावातील सरपंच श्रीमती अकीलाबी शहा आवर्जून उपस्थित राहिल्या व गावातील महिलांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवून आपली उपस्थिती दर्शवली, याप्रसंगी एनएसएस विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ प्रकाश महाजन, डॉ. राकेश अहिरराव डॉ. सीमा काशीद संयोजन समितीचे सदस्य प्रा.प्रगती चव्हाण, ग्रंथपाल डॉ संतोष देशमुख उपस्थित होते, कार्यक्रमाचे सुत्र संचलन आणि पाहुण्यांचा परिचय जानवी गाडे हिने केले कार्यक्रमाचे प्रास्तविक गौरव निकम आभार प्रदर्शन प्रथमेश व्यवहारे याने केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एनएसएस विभागाने विशेष प्रयत्न केले.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




