भुईंज पोलिसांची धडाकेबाज कारवाई - चांदक येथील सोन्याच्या दागिन्यांची चोरी अवघ्या काही तासांत उघड

ओम्नी कारमधून चोरीला गेलेला ६.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त; बांधकाम मजूरच निघाला चोरटा

Police take drastic action, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी  शुभम कोदे )

चांदक (ता. वाई) येथे भरदिवसा ओम्नी कारमधून झालेल्या ६ लाख २८ हजार २०० रुपये किमतीच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या चोरीचा छडा लावण्यात भुईंज पोलिसांना यश आले आहे. अत्यंत कौशल्याने तपास करत पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपीला अटक करून चोरीला गेलेला १०० टक्के मुद्देमाल हस्तगत केला आहे.

     दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २.३० ते ३.३० च्या सुमारास चांदक येथील संकपाळ आळीत एक ओम्नी कार उभी करण्यात आली होती. अज्ञात चोरट्याने कारमधील पर्स चोरून नेली होती, ज्यामध्ये साडेपाच तोळे सोन्याचे दागिने आणि चांदीच्या वस्तूं असा एकूण ६ लाख २८ हजार २०० रुपयांचा ऐवज होता. याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

   गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वाई सुनील साळुंखे यांनी तातडीने तपासाच्या सूचना दिल्या. भुईंज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना केले.

     घटनास्थळाच्या परिसरात चौकशी केली असता, तिथे काही मजूर घराचे बांधकाम करत असल्याचे पोलिसांना समजले. संशयावरून पोलिसांनी अमोल भगवान दरेकर (वय ४०, रा. चांदक) या मजुराला ताब्यात घेऊन विश्वासात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या अमोलने पोलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली दिली.

     चांदक-वेळे रोडवरील स्मशानभूमीजवळील एका पानवठ्याच्या शेजारी, झाडाझुडपातील पालापाचोळ्यात एका मोठ्या दगडाखाली त्याने हे दागिने लपवून ठेवले होते. पोलिसांनी त्या ठिकाणाहून सोन्याचे मोठे मंगळसूत्र, चार सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचे डोरले व ११ अष्टपैलू मणी, चांदीचे ब्रेसलेट आणि चोरीला गेलेली पर्स असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

     ही यशस्वी कारवाई सहा. पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, सुरज शिंदे, पो.हवा. नितीन जाधव, आप्पा कोलवडकर, पो.कॉ. सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते आणि किरण निंबाळकर यांनी केली. गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी संपूर्ण पथकाचे विशेष कौतुक व अभिनंदन केले आहे.

      -----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !