भुईंजमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत ६६ वर्षीय महिलेचा मृत्यू

अपघातानंतर मदत करण्याऐवजी अज्ञात चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार

Old woman killed in accident, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता ओलांडत असताना अज्ञात चारचाकी वाहनाने दिलेल्या भीषण धडकेत एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवार दि.१६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११:१५ च्या सुमारास भुईंज (ता. वाई) गावच्या हद्दीत घडली. अपघातानंतर मदत करण्याऐवजी अज्ञात चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीमती सुलाबाई बबन पवार (वय ६६, रा. विराटनगर, अमृतवाडी, ता. वाई) या सकाळी भुईंज हद्दीतून राष्ट्रीय महामार्ग ओलांडत होत्या. यावेळी सातारा बाजूकडून पुणे बाजूकडे जाणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, सुलाबाई यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 

अपघात घडल्यानंतर जखमीला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेणे किंवा पोलिसांना माहिती देणे आवश्यक होते. मात्र, संबंधित अज्ञात चालकाने जखमीची कोणतीही विचारपूस न करता किंवा पोलिसांना न कळवता आपले वाहन वेगाने पळवून नेले. 

याप्रकरणी मयत सुलाबाई यांचे पुतणे रामेश्वर भिमराव पवार यांनी भुईंज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल केला असून भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक  पाटील अधिक तपास करत आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे अज्ञात पांढऱ्या वाहनाचा शोध घेतला जात आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !