लव्ह जिहाद' विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

 तहसीलदारांना दिले निवेदन

Love Jihad, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी  शुभम कोदे )

महाराष्ट्र राज्यात गेल्या काही काळापासून महिलांच्या बेपत्ता होण्याचे प्रमाण आणि 'लव्ह जिहाद'च्या घटनांमध्ये झालेली वाढ चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या धर्तीवर महाराष्ट्रातही कठोर आणि अजामीनपात्र 'लव्ह जिहाद व अवैध धर्मांतर विरोधी कायदा' तातडीने संमत करावा, या मागणीसाठी आज वाई येथे हिंदु जनजागृती समिती आणि सकल हिंदु समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

निवेदनातून राज्यातील भयावह परिस्थितीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या हवाल्यानुसार, २०१९ ते २०२१ या तीन वर्षांत महाराष्ट्रातून सुमारे १,७८,४०० महिला बेपत्ता झाल्या आहेत. तर १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या एकाच वर्षात ३७,६१५ महिला बेपत्ता झाल्या असून, ही सरासरी दिवसाला १०३ इतकी आहे. यातील १० टक्के मुलींचा शोध लागत नसल्याने त्या मानवी तस्करी किंवा 'लव्ह जिहाद'ला बळी पडत असल्याचा संशय निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.

हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आलेल्या या निवेदनात गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा होईल असा कठोर कायदा लागू करावा, प्रत्येक जिल्ह्यात पोलीस उपअधीक्षक (DySP) दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली 'लव्ह जिहाद विरोधी विशेष पथक' स्थापन करावे, अशा प्रकरणांचा निकाल ६ महिन्यांच्या आत लावण्यासाठी विशेष न्यायालये स्थापन करावीत, तसेच धर्मांतर किंवा आंतरधर्मीय विवाहापूर्वी किमान ६० दिवस आधी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करणे आणि पोलीस चौकशी होणे बंधनकारक करावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

 श्रद्धा वालकर, रबिना पहाडन आणि नेहा हिरेमठ यांसारख्या घटना केवळ बातम्या नसून हिंदु समाजासाठी धोक्याची घंटा आहेत. आदिवासी पट्ट्यात 'लँड जिहाद'द्वारे जमिनी हडपण्याचे प्रकारही वाढले आहेत. सरकारने या विषयाचे गांभीर्य ओळखून या अधिवेशनात ऐतिहासिक निर्णय घेऊन महाराष्ट्राला 'लव्ह जिहाद मुक्त' करावे, अन्यथा हिंदु समाज तीव्र आंदोलन छेडेल," असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

 यावेळी वाई परिसरातील विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने माता-भगिनी उपस्थित होत्या.i

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !