स्तनकर्करोग निदानासाठी नाविन्यपूर्ण उपकरणाचे संशोधन
शिवशाही वृत्तसेवा,सातारा ( प्रतिनिधी शुभम कोदे )
राज्यातील 30 विद्यापीठातील 1000 नव संशोधकांचा सहभाग.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे राज्यस्तरीय अंतरविद्यापीठ अविष्कार संशोधन स्पर्धा सण २०२६ मध्ये घेण्यात आल्या होत्या यामध्ये गौरीशंकरच्या सातारा कॉलेज ऑफ फार्मसी देगाव या महाविद्यालयातील अंतिम वर्ष एम फार्मसी वर्गात शिकत असलेली विद्यार्थीनी अनुष्का दिलीप शेडगे हिने या स्पर्धेत बाजी मारत तृतीय क्रमांक प्राप्त करून महाविद्यालयाच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
संशोधन क्षेत्रात ही स्पर्धा अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. विद्यार्थ्यांमधील संशोधनात्मक वृत्तीला चालना मिळावी तसेच नवकल्पना द्वारे मानवी आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारे नाविन्यपूर्ण औषधाची निर्मिती व्हावी या हेतूने या स्पर्धेचे आयोजन केले जाते. अनुष्का शेडगे हिने कॉमर्स मॅनेजमेंट अँड लॉ या विभागामध्ये सादर केलेल्या प्रोजेक्ट ची तज्ञांनी निवड केली आहे.
सध्या देशात स्तनकर्करोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे यावर अनुष्का शेडगे हिने नव संशोधन करून स्तनकर्करोग निदानासाठी उपयुक्त ठरणारे उपकरण बनविले आहे. या उपकरणामुळे आता स्तनकर्करोग झालेल्या महिलांच्या निदानासाठी खूप उपयोग होणार आहे. विविध निकष व चाचणीच्या आधारे या उपकरणाची तपासणी तज्ञांनी केली असून हे उपकरण स्तनकर्करोगाच्या निदानासाठी प्रभावी व परिणाम ठरणार असल्याचे तज्ञांनी मत व्यक्त केले आहे.
सध्या कर्करोगाच्या निदानासाठी अनेक महागड्या उपकरणाद्वारे चाचणी केली जाते ही चाचणी सर्वसामान्य विशेषता ग्रामीण व दुर्गम भागातील महिलांना आर्थिक दृष्ट्या परवडत नसल्याने ते या आजाराकडे दुर्लक्ष करतात परिणामी या आजाराने देशात मृत्यूचे प्रमाण हे अधिक जाणवते. अनुष्का शेडगे हिने याबाबत सखोल अभ्यास करून शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण व दुर्गम भागातील महिला वर्गामध्ये याबाबत अधिक जनजागृती व प्रबोधन व्हावे यासाठी यापूर्वी तिने कार्य केले आहे त्या माध्यमातूनच तिने नाविन्यपूर्ण उपकरणाचे नव संशोधन केले आहे.
या उपकरणामुळे नजीकच्या काळात स्तनकर्करोगाने त्रस्त असणाऱ्या असंख्य रुग्णांचे प्राण वाचणार आहेत हे उपकरण एक भविष्यात कर्करोग रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे. रुग्णांना परवडेल अशा अल्प दरात या पुढील काळात या उपक्रमाद्वारे चाचणी होणार असून कर्करोगाचे वाढते प्रमाण रोखण्यास मदत होणार आहे. तिने बनविलेले या नावीन्यपूर्ण उपकरणामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी नवक्रांती झाली आहे.
तिच्या या यशाबद्दल नुकताच महाविद्यालयात संस्थेचे संचालक डॉ अनिरुद्ध जगताप प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर यांच्या हस्ते सत्कार घेण्यात आला यावेळी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, प्राचार्य डॉ नागेश अलुरकर, उपप्राचार्य डॉ योगेश गुरव, डॉ मनोज शिंदे, प्रा. स्पर्षा बांदेकर आदी प्रमुख उपस्थित होते. अनुष्का शेडगे हिने संशोधन क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल विविध क्षेत्रातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तिला प्रा. स्पर्षा बांदेकर यांनी मार्गदर्शन केले.
दर्जात्मक गुणात्मक शिक्षणाचे ज्ञान केंद्र ठरलेल्या गौरीशंकर च्या सातारा कॉलेज ऑफ फार्मसी देगाव या महाविद्यालयाने नेहमीच गुणवत्तेत आपला झेंडा उंचावला आहे सलग तेरा वर्ष अविष्कार संशोधन स्पर्धेत बाजी मारणाऱ्या या महाविद्यालयाने असंख्य नवसंशोधक घडवलेले आहेत. नव संशोधनासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करणे त्याचप्रमाणे त्यांना उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करून देणे यासाठी महाविद्यालयाचे नेहमीच प्रयत्न राहिले आहेत. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व प्रेरणा देण्याबरोबरच येथील तज्ञ प्राध्यापकांचे अनमोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभत असल्याने विद्यार्थी शैक्षणिक व नव संशोधनात भरीव कामगिरी करताना दिसून येत आहे.
मदनराव जगताप अध्यक्ष गौरीशंकर नॉलेज सिटी सातारा.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




