विरोधकांचा कावा चालणार नाही - खासदार नितीन पाटील

ओझर्डे गटात राष्ट्रवादीचा विजयाचा गुलाल निश्चित

NCP, BJP, ZP, Panchayat samiti election, Wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

"वाई तालुक्याच्या पूर्व भागाची तारणहार असणारी कवठे-केंजळ उपसा जलसिंचन योजना पूर्णत्वास नेण्यासाठी मंत्री मकरंद पाटील कटीबद्ध आहेत. मात्र, स्वतःच्या कार्यकाळात किसन वीर कारखान्याला कर्जाच्या खाईत लोटून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या मदन भोसलेंना ओझर्डे गटातील मतदार कदापि माफ करणार नाहीत. येणाऱ्या निवडणुकीत मतदारच त्यांना घरी बसवतील," अशा शब्दांत खा. नितीन पाटील यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

वाई तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओझर्डे गटातील केंजळ गणामध्ये आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

"राष्ट्रवादीचा पराभव फक्त राष्ट्रवादीच करू शकते, विरोधकांमध्ये ती ताकद नाही," असा आत्मविश्वास खासदार पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते प्रतापराव पवार व सत्यजित वीर म्हणाले की, राष्ट्रवादीने यावेळी ओझर्डे गटातून उच्चशिक्षित उमेदवार वृषाली चव्हाण, ओझर्डे गणातून हर्षदा फरांदे आणि केंजळ गणातून सर्वसामान्य कुटुंबातील तरुण शैलेश सपकाळ यांना संधी दिली आहे. तरुणांना आणि अभ्यासू व्यक्तींना संधी देऊन पक्षाने सर्वसामान्यांच्या हिताचा विचार केला आहे.

या सभेला माजी सभापती सत्यजित वीर, माजी उपसभापती महादेव मस्कर, उदयसिह पिसाळ, अनिल जगताप,गणेश फरांदे,विजयसिंह पिसाळ, रतन (आबा) शिंदे,  माजी जि.प. सदस्य शशिकांत पवार,शेखर फरांदे,विक्रम पिसाळ, विश्वजीत पिसाळ, रवींद्र जाधव,विशाल फरांदे,सागर फाटक, कुमार जगताप, किरण काळोखे, किरण जाधव, राहुल डेरे, रामदास इथापे, संतोषराव पवार, दादासाहेब गायकवाड,संदीप पिसाळ, अमोल कदम यांच्यासह ओझर्डे गटातील ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल कदम यांनी केले, तर आभार कुमार जगताप यांनी मानले.

ठळक मुद्दे

विकासकामांचा लेखाजोखा: ओझर्डे गटातील प्रत्येक गावात राष्ट्रवादीने कोट्यवधींचा निधी देऊन विकासाचा डोंगर उभा केला आहे.कवठे-केंजळ योजना: तांत्रिक अडचणींमुळे या योजनेला उशीर झाला असला, तरी ही योजना अजितदादांच्या माध्यमातून मकरंद पाटलांनीच मंजूर केली असून ती पूर्ण करण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे

विरोधकांवर टीका

भाजपकडे स्वतःचे नेतृत्व नसल्याने त्यांना आयात नेत्यांच्या जिवावर मतांचा जोगवा मागावा लागत आहे. "नगरपालिकेच्या यशाने विरोधकांनी हुरळून जाऊ नये. वाई तालुक्याची संस्कृती बदलण्याचा जो घाट घातला जात आहे, त्याला जनता चोख उत्तर देईल.

- खासदार नितीन पाटील

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !