आयात नाही-तर विजेता - उमेदवार यशवंतनगरमध्ये राष्ट्रवादीची करेक्ट कार्यक्रम ची रणनीती

वाडकर यांचा दावा म्हणजे पराभवाच्या छायेतील निराशेचा सूर - बापूसाहेब शिंदे

Election, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )

यशवंतनगर जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसने निष्ठावंतांचा बळी दिल्याची ओरड करणारे भाजपचे उमेदवार रोहित वाडकर यांना आतापासूनच पराभव स्पष्ट दिसू लागला आहे. ज्यांना आपण 'आयात' म्हणत आहात, ते बापू शिंदे म्हणजे राष्ट्रवादीची या भागातील ताकद वाढवणारी मोठी 'पॉवर' आहे. केवळ राजकीय सोयीसाठी 'निष्ठावंतांचा पुळका' आणणाऱ्या भाजपने स्वतःच्या घरात डोकावून पाहावे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे उमेदवार बापूसाहेब शिंदे यांनी प्रतिहल्ला चढवला आहे.

विधानसभा निवडणुकीत मिळालेले १३.५० हजारांचे मताधिक्य ही राष्ट्रवादीच्या कामाची पावती आहे. राष्ट्रवादीच्या ध्येयधोरणांवर विश्वास ठेवून जेव्हा एखादा कर्तबगार नेता पक्षात येतो, तेव्हा तो 'आयात' नसून पक्षाच्या विस्ताराचा भाग असतो. बापू शिंदे यांच्या रूपाने पक्षाला या गटात एक सर्वसमावेशक चेहरा मिळाला असून, त्यांच्या उमेदवारीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

"काही कार्यकर्ते अलिप्त आहेत" हा रोहित वाडकर यांचा दावा पूर्णपणे फोल आहे. उलट, बापू शिंदेंच्या उमेदवारीनंतर राष्ट्रवादीचे सर्व गट-तट एकत्र आले असून, 'पक्षाचा आदेश' मानून प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्ता आज प्रचारात सक्रिय आहे. ज्यांना न्याय मिळाला नाही असे वाटत होते, त्या कार्यकर्त्यांनाही सन्मानपूर्वक मुख्य प्रवाहात सामावून घेण्याची तयारी पक्षाने केली आहे. त्यामुळे बापू शिंदे यांना मिळणारा प्रतिसाद पाहून भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.

वाई पालिकेत भाजपने जे काही साध्य केले, ते केवळ संभ्रम निर्माण करून मिळवलेले यश होते. मात्र, जिल्हा परिषदेचे राजकारण हे थेट ग्रामीण भागातील जनतेच्या जिव्हाळ्याचे आहे. पश्चिम भागातील ९० टक्के गावांत आजही राष्ट्रवादीचीच पकड आहे. ही पकड ढिली करण्यासाठी विरोधक 'निष्ठावंत विरुद्ध आयात' असा भावनिक डाव टाकत आहेत, पण मतदार याला बळी पडणार नाहीत.

"बापू शिंदे हे स्थानिक जनतेच्या प्रश्नांची जाण असणारे नेतृत्व आहे. रोहित वाडकर यांनी आपल्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी आत्तापासूनच 'निष्ठावंतांच्या बळी'ची स्क्रिप्ट तयार केली आहे. यशवंतनगरची जनता कामाला मते देईल, आरोपांना नाही", असा घणाघाती पलटवार बापूसाहेब शिंदे यांनी केला आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !