व्याजवाडीच्या कोपरा सभेत मकरंद आबा कडाडले

विकासाची ब्लूप्रिंट मांडत विरोधकांना दिले आव्हान

Election, Satara, wai, shivshahi news.

 शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीने आता वेग घेतला असून, वाई तालुक्यातील व्याजवाडी येथे गुरुवार दि . ०५ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रचाराचा कंतोफखाना धडाडला. बावधन जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार ऋतुजाताई शिंदे आणि बावधन पंचायत समिती गणाचे उमेदवार विक्रम पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेने निवडणुकीच्या वातावरणात मोठी रंगत आणली आहे.

सभेत बोलताना ना. मकरंद पाटील यांनी गेल्या काही काळात मतदारसंघात झालेल्या विकासकामांचा पाढा वाचला. केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृतीवर आमचा भर असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. यावेळी त्यांनी भविष्यातील विकासाचे नियोजन मतदारांसमोर मांडले, ज्यामध्ये प्रामुख्याने प्रलंबित रस्त्यांची कामे तातडीने मार्गी लावणार, गावातील पाणी, वीज आणि इतर मुलभूत प्रश्न प्राधान्याने सोडवणार, महसूल विभागाच्या माध्यमातून नवीन योजना थेट सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचवणार. या मुद्द्यांचा समावेश होता.

राजकीय फटकेबाजी सुरू असतानाच या सभेत एक हृदयस्पर्शी प्रसंग पाहायला मिळाला. महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या एका आदरणीय दिवंगत नेत्याला यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. "त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही," अशा शब्दांत ना. मकरंद पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या नेत्याच्या समाजसुधारणेचे आणि प्रगतीचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.

ना. मकरंद पाटील यांनी ऋतुजाताई शिंदे आणि विक्रम पाटील यांच्या कार्याचा गौरव करत, गट व गणाच्या शाश्वत विकासासाठी 'घड्याळ' चिन्हासमोरील बटण दाबून उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. विकासाची आश्वासने आणि भावनिक साद यामुळे व्याजवाडीतील या सभेची चर्चा सध्या संपूर्ण परिसरात रंगली होती.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !